'अशा' पद्धतीने झोपल्यास होऊ शकते अ‍ॅसिडीटी, आताच बदला 'ही' सवय

बदलती जीवनशली आणि चुकीच्या आाहारपद्धतीचा परिणाम शरिरावर होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने झोपत असाल तर तुम्ही आजाराला आमंत्रण देत आहात असं सांगितलं जातं.   

May 13, 2024, 18:32 PM IST
1/7

प्रमाणापेक्षा जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ वारंवार खाल्याने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत  सर्रास सगळ्यांनाच अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असतो. चुकीच्या आहारपद्धतीमुळे बऱ्याचदा छातीत जळजळणं, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होतो. 

2/7

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याला कारण जसं फास्टफूड आहे, तसंच तुम्ही तुमच्या झोपण्याच्या सवयी देखील आहेत.आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे रात्री जेवणानंतर किमान तीन तासांच्या अंतराने झोपणं आवश्यक आहे.   

3/7

अ‍ॅसिडीटी होणं म्हणजे शरीरातील पचन संस्थेत बिघाड असणं. ही समस्या फक्त चुकीच्या आहारामुळे नाही तर चुकीच्या पद्धतीने झोपण्याच्या सवयीमुळे देखील होते.   

4/7

.   बऱ्याच जणांना पालथ झोपण्याची किंवा पाठीवर झोपण्याची सवय असते. पालथ झोपल्याने पोटावर ताण येतो, त्यामुळे पाचनसंस्थेवर याचा परिणाम होतो.  त्याचबरोबर पाठीवर फार काळ झोपल्याने देखील अ‍ॅसिडीटी वाढण्याची समस्या होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणं शरीराठी फायदेशीर ठरतं.  

5/7

 रात्रीच्या जेवणात सहसा मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. सतत फास्टफूड खाण्याचा  परिणाम म्हणजे कडवट ढेकर आणि घश्याजवळ आंबट पाणी येण्याचा त्रास वारंवार जाणवायला सुरूवात होते. 

6/7

असं म्हणतात की, भूकेला एक घास कमी खाल्याने जेवण पचण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी शरीराची जास्त हलचाल होत नाही तसंच पचनसंस्थेला वेग मंदावलेला असतो. म्हणूनच रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्यावा.  

7/7

म्हणूनच अ‍ॅसिडीटीचा वारंवार त्रास होत असल्यास चुकीच्या जेवणाच्या वेळा आणि झोपेची सवय बदलल्याने अ‍ॅसिडीटीचा कमी होण्यास मदत होते.