Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 May 2024, 18:15 वाजता

अंबादास दानवेंची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

 

Ambadas Danve : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांसाठी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुगीची कामं करण्यात येतायत.. त्याच्या स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याचा आरोप दानवेंनी केलाय.. एक प्रकारे हा आदर्श आचारसंहितेचा भाग आहे.. तेव्हा याची चौकशी करुन संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी दानवेंनी पत्र लिहून मुख्य निवडणूक आयुक्तांना केलीय..

 

15 May 2024, 17:40 वाजता

उद्धव ठाकरेंच्या 18 मे रोजी मुंबईत 4 सभा

 

Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचारांचा धुरळा उडणार आहे.. उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत.. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार आहेत.
उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या या सभा पार पडणार आहेत.. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणेसह उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा समावेश आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 May 2024, 17:12 वाजता

'नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार', पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

PM Modi on Uddhav Thackeray : नाशिकच्या दिंडोरीमधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं विधान मोदींनी केलंय.. शिवसेना ठाकरे पक्ष जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. कारण बाळासाहेबांना तेव्हा खुप दु:ख होईल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. राम मंदिर निर्माण, काश्मीरमधून कलम 370 हटवणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न पूर्ण झाल्याचा सर्वात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 May 2024, 16:05 वाजता

नाशिकमध्ये मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावर घोषणाबाजी

 

Nashik Farmers : मोदींच्या नाशिकमधल्या सभेत कांदा प्रश्नावरुन घोषणाबाजी करण्यात आली... कांदा प्रश्नावर बोला अशी मागणी मोदींच्या सभेत करण्यात आली... या शेतक-याला मग ताब्यात घेण्यात आलं. शेतक-याने घोषणाबाजी केल्यानंतर थोड्या वेळाने मग मोदींनी कांदा प्रश्नावर बोलायला सुरुवात केली..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 May 2024, 15:47 वाजता

जागृतीनगर ते घाटकोपरपर्यंत मेट्रो बंद राहणार, मोदींच्या सुरक्षेसाठी मेट्रो बंद राहणार

 

Mumbai Metro : जागृतीनगर ते घाटकोपरपर्यंत मेट्रो बंद राहणार...पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या कारणासाठी मेट्रो बंद राहणार...संध्याकाळी 6 पासून मेट्रो बंद राहणार..

15 May 2024, 14:26 वाजता

मोदींना जिरेटोप हे 'पटेल' का?

 

Sanjay Raut & Chandrashekar Bawankule On Praful Patel : प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना जिरेटोप भेट दिला, यावरुन राजकारण तापलंय. मोदींनी प्रफुल्ल पटेलांवर दाऊदवरुन आरोप केले होते, त्याच पटेलांकडून सत्कार स्वीकारला.. हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका राऊतांनी केलीय. तर स्वागत स्वीकारणा-याला नेमकं कसं स्वागत असणार याची कल्पना नसते.. मात्र कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असं चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 May 2024, 13:56 वाजता

ज्योतिरादित्य सिंदिया यांना मातृशोक

 

Jyotiraditya Scindia Mother Passes Aay : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना मातृशोक झालाय. ज्योतिरादित्य यांची आई माधवी राजे यांचे न्युमोनियामुळं निधन झालंय. दिल्लीती एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या 70व्या वर्षी माधवी राजेंनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गेल्या काही महिन्यांपासून माधवी राजेंची प्रकृती चिंताजनक होती.

बातमी पाहा - साताऱ्यातील शिंदे ग्वाल्हेरचे 'सिंधीया' कसे बनले? पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं?

15 May 2024, 13:41 वाजता

प्रफुल्ल पटेल यांच्याकडून माफी नाहीच

 

Praful Patel Tweet : जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांनी ना माफी मागितलीय ना दिलगिरी व्यक्त केलीय.. यापुढे काळजी घेऊ इतकीच भूमिका प्रफुल्ल पटेलांनी घेतलीय. ट्विट करत प्रफुल्ल पटेलांनी आपली भूमिका मांडलीय. मोदींना जिरेटोप घालण्यावरुन प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड उठली होती.. त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.. मात्र पटेलांकडून माफी वा दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली नाही..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 May 2024, 12:36 वाजता

महादेव बेटिंग अ‍ॅपचं पुणे कनेक्शन उघडकीस

 

Mahadev Betting App : महादेव बेटिंग अ‍ॅपचं पुणे कनेक्शन उघडकीस आलंय.. पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी केलीये.. या छापेमारीमध्ये तब्बल 70 ते 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. नारायणगावातील एका इमारतीचा वापर महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी वापरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. त्यानंतरपोलिसांनी ही कारवाई केलीये.. नारायणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.. या घटनेमुळे परदेशासह देशातील ग्रामीण भागातही बेटिंग अ‍ॅपची पाळंमुळे रुजल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 May 2024, 11:47 वाजता

देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांबाबत गौप्यस्फोट

 

Devdendra Fadanvis On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीमुळे सुरुवातीला भाजपचा मतदार नाराज झाला होता..मात्र अजित पवारांच्या वागण्यामुळे भाजपच्या मतदारांचा कल बदलला.. असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय. बारामतीच्या निकालात भाजप मतदारांचं योगदान ठळकपणे दिसेल असा दावाही फडणवीसांनी केलाय.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांबद्दल गौप्यस्फोट केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -