रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत!

Garlic And Jaggery Health Benefits: रोज गुळ आणि लसूण खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 15, 2024, 05:47 PM IST
रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत! title=
health tips in marathi Garlic And Jaggery Health Benefits for bad cholesterol

Garlic And Jaggery Health Benefits: कोलेस्ट्रॉल वाढणे हे शरीरासाठी धोक्याचे ठरु शकते. कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकार व हार्ट अॅटेकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तपुरवठा हळुवार होतो. त्यामुळं हार्ट अटॅकसोबत इतर गंभीर समस्यांचा धोकाही वाढतो. त्यामुळं कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे आहे. जास्त प्रमाणात तेल-तुप व मसालेदार पदार्थ खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचाही वापर करु शकता. 

बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी तुम्ही गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसूण खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नसांमधून बॅड कोलेस्ट्ऱॉल काढण्यासाठी गुळ आणि लसूण कसे व कधी खावे याची माहिती जाणून घ्या. आयुर्वेदानुसार, हृदयविकार टाळण्यासाठी उत्तम उपाय आहे. तुम्ही गुळ आणि लसणाची चटणी बनवून खाऊ शकतात. ही चटणी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या चटणीसोबत खाऊ शकता. 

लसूण आणि गुळाचा काय फायदा?

लसणामध्ये अॅलिसिन नावाचे गुणधर्म असतात. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्निशियमसारखे गुणधर्म असतात. त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिम आणि थायमिनदेखील असतात. लसणातील गुणधर्म चयापचय वाढवतात. यामुळं शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्ताची कमतरतादेखील दूर होते. लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचे कामदेखील करते. 

कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते 

लसणामध्ये असलेले अॅलिसिन एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिकरणाला रोखतं. यामुळं कोलेस्ट्रोलची मात्रा कमी होते आणि आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर, कच्चा लसूण आहारात समावेश केल्यास पचनासंबंधी समस्या दूर होतात. यामुळं आतड्यांना आलेली सूजदेखील कमी होते आणि शरीरातील विषारी पदार्थही नष्ट होतात. 

वजन कमी करण्यास फायदेशीर 

लसूण आणि गुळाचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. लसणात असलेल्या गुणधर्मांमुळं मेटाबॉलिज्म वाढते आणि फॅट बर्निंगची प्रक्रियादेखील वाढते. तुम्ही रोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या गुळासोबत खाऊ शकतो. 

आयर्न वाढवते

शरीरात हिमोग्लोबीनची मात्रा वाढवण्यासाठी लसणासोबत गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. दररोज लसूण आणि गुळाचे सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरुन निघते आणि शरीराला उर्जा मिळते.

लसूण आणि गुळाचे सेवन कसे कराल?

लसूण आणि गुळाचे सेवन रोज सकाळी रिकाम्या पोटी करणे गरजेचे आहे. लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या तुपात परतवून घ्या. त्यानंतर लसूण गुळासोबत रिकाम्या पोटी सेवन करा. नियमित याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)