'मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान न करु देताच...' गायिका सावनी रविंद्रने व्यक्त केली नाराजी

गायिका सावनी रविंद्र मतदानाचा हक्का बजावण्यासाठी मतदान क्रेंद्रावर गेली मात्र तिला धक्कादायक अनुभव आला आहे. एक पोस्ट शेअर करत सावनीने नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: May 13, 2024, 12:45 PM IST
'मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान न करु देताच...' गायिका सावनी रविंद्रने व्यक्त केली नाराजी title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान सोमवारी 12 मे 2024 रोजी सुरु झालं आणि राज्यातील या निमित्तानं सज्ज असणाऱ्या मतदान केंद्रांवर कमालीची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. काही मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली. सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र एका प्रसिद्ध गायिकेने नाराजी व्यक्त केली आहे. 

नुकतीच गायिका सावनी रविंद्र मतदानाचा हक्का बजावण्यासाठी मतदान क्रेंद्रावर गेली मात्र तिला धक्कादायक अनुभव आला आहे. एक पोस्ट शेअर करत सावनीने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सावनीने दोन फोटो शेअर केले आहेत. एकात तिने तिच्या सेल्फी शेअर केलाय तर दुसऱ्या फोटोत तिने तिच्या बोटाचा फोटो शेअर केला आहे. 

यासोबतच तिने  शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''गेले अनेक दिवस सर्व online पोर्टल वर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज voting booth ला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. ( ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. या बद्दल स्वतः वोटिंग officer ची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक @governmentmaharashtra''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  अनेकांनी कमेंट करत गायिकेलाच सुनावलय तर अनेकांनी तिची बाजू घेतल्याचं कमेंट बॉक्समध्ये दिसतंय. एकाने कमेंट करत लिहीलंय की, मतदार यादी निवडणूक पूर्वी प्रसिद्ध होते त्या वेळेस चेक करून ऑब्जेक्षन घ्यावं लागतं. तर अजून एकाने लिहीलंय, voter Helpline App ला जाऊन 17 नंबर चा फॉर्म भरून घ्यावा नंतर नाव येली आता विधानसभा निवडणूक मध्ये नाव येईल आता. अजून एकाने लिहीलंय, मत दिलाच नाही का अजून? तर जून एकजण म्हणतोय, हि परिस्थितिय सर्वत्र दिसली माझा मित्राला पन मत देता आल नाही. अशा प्रकारच्या कमेंट युजर्स गायिकेच्या पोस्टवर करतना दिसत आहेत.