हीरामंडीचा दुसरा सीझन येणार? संजय लीला भन्साळींनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले अशी कलाकृती...

Heeramandi 2: संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी सीरीजचा दुसरा सीझन येणार का? यावर खुद्द भन्साळींनीच उत्तर दिलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 14, 2024, 01:00 PM IST
हीरामंडीचा दुसरा सीझन येणार? संजय लीला भन्साळींनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले अशी कलाकृती...  title=
Heeramandi 2 Can Not Be make it says Sanjay Leela Bhansali

Heeramandi 2: संजय लीला भन्साळी यांचा हीरामंडीः द डायमंड बाजार ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरीज प्रदर्शित झाली आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हीरामंडी चर्चेत होती. भव्यदिव्य सेट, गाणी आणि संवाद यामुळं हीरामंडी हिट ठरली आहे. भन्साळी यांनी या सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू केला आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना मोठे यश मिळाले आहे. संजय लीला भन्साळी लवकरच हीरामंडीचा दुसरा सिझन आणण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा होत आहेत. पण या सगळ्या चर्चांवर पहिल्यांदाच भन्साळींनी उत्तर दिलं आहे. व हीरामंडीचा सिझन 2 येणार का? हे देखील सांगितले आहे. 

हीरामंडीला सध्या भरभरुन यश मिळत आहे. या सीरीजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, शर्मिली सेगल, रिचा चड्ढा आणि संजिदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या अभिनेत्रींच्या भूमिकांचेही खूप कौतुक होत आहे. सध्या सीरीजच्या प्रमोशनसाठी संजय लीला भन्साळी हे विविध माध्यमांना मुलाखत देत आहेत. तेव्हा त्यांनी सीरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. भन्साळी म्हणतात की ही सीरीज आमच्यासाठी एक टेस्टिंग प्रोसेस आहे. आम्ही ती बनवली आहे, मी सीरीजवर काम करताना त्याचा पुरेपुर आनंद घेतला आणि मी देवाचे आभार मानेन की आम्ही ही सीरिज पूर्ण केली. हा एक कठिण प्रोजेक्ट होता. हीरामंडी पुन्हा कोणीच बनवू शकणार नाही. अगदी मी देखील नाही बनवू शकणार. कारण अशी कलाकृती एकदाच बनते, असं भन्साळी यांनी म्हटलं आहे. भन्साळी यांच्या या मुलाखतीनंतर हीरामंडीचा दुसऱ्या सिझन येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भन्साळी यांनी पुढे म्हटलं आहे की, या सीरीजची आयडिया त्यांना 20 वर्षांपूर्वीच आली होती. प्रत्येक चित्रपटानंतर हीरामंडीचा विचार येत होता. पण हे खूप महाकाय होतं. दोन तासांच्या चित्रपटात हे सर्व बसवणे खूप कठिण होते. शेवटी ती वेळ आलीच आणि आम्ही हीरामंडीची सिरीजच्या रुपात प्रेक्षकांसमोर ठेवू, असा विचार केला. जेणेकरुन हीरामंडीला न्याय मिळेल.

हीरामंडीमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मिन सहगल यांनी स्वांतत्र्यता पूर्व लाहोर येथील तवायफांची भूमिका साकारली आहे. जे त्यांच्या अस्तित्व आणि सन्मानांसाठी लढताहेत. या सीरीजमध्ये अभिनेता शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन, ताहा शाह बहादुर आणि इंद्रेश मलिक यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.