'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'अशोका' (Asoka) चित्रपटातील 'सन सनन' (San Sanana) गाणं ट्रेंड होत आहे. कंटेंट क्रिएटर्स या गाण्यावर लिप-सिंक करत आपलं कौशल्य दाखवत आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 15, 2024, 05:06 PM IST
'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल title=

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवे व्हिडीओ आणि गाणी ट्रेंड होत असतात. एखादी ऑडिओ क्लिप किंवा गाणं ट्रेंड झाल्यानंतर सर्व कंटेंट क्रिएटर्स त्यावर रिल करण्यास सुरुवात करतात. व्हिएतनाममधील काही ग्लोबल ब्युटी इन्फ्लुएन्सर्समुळे शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'अशोका' (Asoka) चित्रपटातील 'सन सनन' (San Sanana) गाणं ट्रेंड झालं आहे. हे गाणं गात या तरुणी सुंदर नवरीमुलीच्या वेषात बदलताना दिसत आहेत. 

हे गाणं सध्या ट्रेंडमध्ये असून कंटेंट क्रिएटर्स या गाण्यांवर लिप-सिंक करत आपलं कौशल्य दाखवत आहेत. अनेक देशातील लोक या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी ते आपल्या पद्धतीने हे गाणं सादर करत आहेत. आता बॉलिवूडमधील या गाण्यावर भारतीयांनी रिल केल्या नाही तर मग आश्चर्यच. पण भारतीय रिल करताना नेहमी त्यात काहीतरी अफलातून प्रयोग करत असतात. 

एका एआय आर्टिस्टने या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्रींचा चेहरा वापरत या गाण्यावर रिल तयार केली आहेत. @rhetoricalronak याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चार तरुणी असून त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धा कपूर, आलिया भट, कंगना राणावत आणि अनन्या पांडे यांचे चेहरे वापरण्यात आले आहेत. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आर्टिस्टचं कौतुक करत आहेत. यातील खासकरुन श्रद्धा कपूर आणि कंगनाला ज्याप्रकारे सादर करण्यात आलं आहे त्याने ते प्रभावित झाले आहेत. एका युजरने तर या आर्टिस्टला पुरस्कार द्या अशी मागणीच केल आहे. 

एका युजरने कमेंट केली आहे की, "कंगनाच्या भूमिकेसाठी तुला पुरस्कार दिला पाहिजे". तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, "या नापतोलमधील अनन्या पांडे, श्रद्धा कपूर, आलिया भट आणि कंगना आहेत".

'अशोका' हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट आहे जो सम्राट अशोकाच्या सुरुवातीच्या जीवनाचे चित्रण करतो. शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटात काल्पनिक घटकांसह ऐतिहासिक उल्लेख आहेत. याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाचं कौतुक झालं. विशेषत: त्याच्या सिनेमॅटोग्राफीसाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली.