'मला 6 महिने दिले असते तर, 'पेहेला नशा' गाणं ऐकून वाटतं वाईट', प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक वक्तव्य करुन खळबळ उडवली आहे.

Updated: May 13, 2024, 04:53 PM IST
'मला 6 महिने दिले असते तर, 'पेहेला नशा' गाणं ऐकून वाटतं वाईट', प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य title=

मुंबई : अभिनेत्री सुचित्रा पिल्लई ही एक अशी अभिनेत्री आहे. जी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. ९० च्या दशकातील लोकांना तिचे संगीत व्हिडीओ आठवत असतील. 'हिप हिप हुर्रे' या शोमधी तिची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. आजही अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे. 

मनोरंजन इंडस्ट्रीमधील पॉप्यूलर चेहरा सुचित्राला लोकं दिल चाहता है या सिनेमामुळे ओळखत असतील. या आइकॉनिक सिनेमात सुचित्राने सैफ अली खानच्या गर्लफ्रेंडची भूमिका प्रियाचं पात्र साकारलं होतं. जे तिला गरजेपेक्षा जास्त कंट्रोलमध्ये ठेवतं. 

लोकं आजही अभिनेत्रीला ओळखतात 'दिल चाहता है गर्ल' 
आता एका मुलाकतीत सुचित्राने सांगितलं आहे की, आत्ताही लोकं जेव्हा तिला भेटताता तेव्हा तिला  'दिल चाहता है गर्ल' म्हणूनच ओळखतात. तिने सांगितलं की, ती ५४ वर्षांची आहे आणि आत्ताही जेव्हा लोकं या कॅरेक्टरसोबत तिला गर्ल हा म्हणतात तेव्हा खूप मजा येते. सुचित्राने मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे की, तिने केवळ वयाच्या १७ व्या वर्षी आमिर खानच्या एका आयकॉनिक चित्रपटाची ऑफर आली होती. पण शिक्षणाच्या नादात तिने ती मुख्य भूमिका सोडली.

सुचित्राला आली होती 'जो जीता वही सिकंदर' सिनेमात मुख्य भूमिकेची ऑफर
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आपलं करिअर आणि इंडस्ट्रीमध्ये आपले जुने दिवसांची आठवण करत सुचित्रा म्हणाली, माझे सिनेमा एका पाठोपाठ एक आले. मला खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधीही मिळाली.  मला खूप लहान वयात खूप चांगली कामं करण्याची संधी मिळाली. 

जर मी ती संधी गमावली नसती तर आज माझं आयुष्य खूप सुंदर असतं. जेव्हा मी इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात होते, तेव्हा मला 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर आली.  त्यांना शूटसाठी 6 महिन्यांची गरज होती आणि मी कॉलेजच्या फर्स्ट ईअरला होते. मी तेव्हा तरुण होते, तेव्हा मी 17 वर्षांची होते.  त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी आत्ता माझे 6 महिने तुम्हाला देऊ शकणार नाही. पण मला याचा पश्चात्ताप नाही. मला फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते, 'पहेला नशा पहला खुमार' हे गाणे जेव्हाही ऐकते तेव्हा मला खूप वाईट वाटतं.