लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे. 

Updated: May 5, 2024, 10:26 PM IST
लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप title=

lok sabha election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आलेल्या 26/11 चा दहशतवादी अजमल कसाबची... अजमल कसाबला फासावर लटकवलं गेलं.. मात्र अजूनही त्याच्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत... शहीद हेमंत करकरेंबाबतच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूरमधील वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं...त्याचबरोबर वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला...यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचं पहायला मिळालं..

2007 मुंबईत दहतवादी हल्ला आणि दहशतवादी अजमल अमीर कसाबचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप नेते उज्ज्वल निकमांवर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिलाय.. हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला, हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केलेत.

तर वडेट्टीवारांच्या या आरोपांवर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षानं घणाघात केला आहे.  बिन बुडाचे आरोप करणे योग्य नाही. ज्यांनी देशद्रोह्यांना फासावर चडवले उलट त्यांना मारण्याचा कट होता.जो देशासाठी समर्पण करतो आणि त्याला असे बोलणे योग्य नाही.देशासाठी मला काम करायचे देशद्रोह्यांना मला गडायचे असे म्हणणाऱ्या लोकांवर आरोप करणे योग्य नाही  असे संजय शिरसाट म्हणाले.  

विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केलेत. पुस्तकातील विधानं सत्य मानायचं की न्यायालयाचा निकाल, असा सवाल शेलारांनी केला. तसंच या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडावी असं आवाहनही त्यांनी केलं. 

लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंच्या मृत्यूचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप केलेत. आता भाजपनं हा मुद्दा उचलून धरलाय. त्यामुळे हा मुद्दा नजीकच्या काळात तापण्याची शक्यता आहे..