कोरोनाने चीन पेक्षा इटलीत का घातलंय थैमान? पाहा काय आलंय समोर

कोरोना व्हायरसने इटलीमध्ये सर्वाधिक थैमान का घातलं आहे?

Updated: Mar 20, 2020, 12:57 PM IST
कोरोनाने चीन पेक्षा इटलीत का घातलंय थैमान? पाहा काय आलंय समोर title=

मुंबई : संपूर्ण जगाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने इटलीमध्ये सर्वाधिक थैमान घातलं आहे. १९ मार्चला इटलीमध्ये झालेल्या मृत्यूचं प्रमाण हे चीन पेक्षा ही अधिक आहे. कोरोना व्हायरल डिसेंबर महिन्यात पसरण्यास सुरुवात झाली होती.

कोरोना व्हायरसने इटलीमध्ये आतापर्यंत ३४०४ जणांचा बळी घेतला आहे. २१ फेब्रवारीला येथे कोरोना पसरला होता. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३२४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये बुधवारी एकाच दिवसात ४७५ लोकांचा बळी गेला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात बळींचा आकडा पाहून संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. 

सिविल प्रोटेक्शन एजेंसीच्या माहितीनुसार, इटलीमध्ये जवळपास ४१ हजार लोकांना कोरोना झाल्याचा संशय आहे. तर मागील तीन दिवसात इटलीमध्ये कोरोना १४.९ टक्क्यांनी वाढला आहे. इटलीमध्ये इतर देशांच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण १२ टक्के अधिक आहे. 

कोरोना व्हायरसमुळे वृद्ध व्यक्तींना अधिक धोका निर्माण झाला आहे. ज्यांना आधीपासून काही आजार आहे. त्यांना कोरोना अधिक लवकर होत आहे. इटली सर्वाधिक वृद्ध व्यक्ती असलेला दुसरा देश आहे. येथे युवा पीढी अधिक वृद्ध व्यक्तींच्या संपर्कात असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पसरल्याचं बोललं जातंय.

इटलीमध्ये वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहतात. येथील युवा पीढी देखील आपल्या आजी-आजोबांसोबत राहणं पसंत करते. ग्रामीण भागातील युवा वर्ग कामासाठी शहरात येत असला तरी ते नंतर आजी-आजोबा आणि आई-वडिलांसोबत ग्रामीण भागात राहतात. 

गावातून शहराक आणि ऑफीस सुटल्यानंतर पुन्हा ग्रामीण भागात नोकरदार वर्ग जात असल्याने कोरोना शहरातून ग्रामीण भागात पोहोचला. शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून घरी घेल्यानंतर हा व्हायरल वृद्धांमध्ये पसरला.

वृद्ध व्यक्तींनी श्वसनाची क्षमता कमी असल्याने हा व्हायरस त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात पसरला. मुलांमध्ये प्रतिकार क्षमता अधिक असते. मुलांची श्वसनाची क्षमता ही चांगली असते. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसावर याचा अधिक प्रभाव पडत नाही. 

इटली संपूर्णपणे लॉकडाउन आहे. हा व्हायरस आणखी पसरु नये म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पण जेथे वृद्ध व्यक्ती जास्त तेथे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जपानमध्ये २८ टक्के लोकांचं वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे. पण येथे कोरोनाचे ९२४ संशयित समोर आले. तर इटलीत ४१ हजार प्रकरण समोर आले. तर ३४०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये सुरुवातीलाच यावर उपाययोजना करणं महत्त्वाचं होतं. पण त्याला उशीर झाला आणि आता गंभीर परिस्थिती उद्भवली.

इटलीमध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे कोरोनाने अधिक लोकांचा मृत्यू झाला. 

कोरोनामुळे मरणाऱ्यांची जेव्हा मेडिकल पार्श्वभूमी पाहिली गेली तर फक्त ०८ टक्के लोकंच असे होते ज्यांना आधीच कोणता आजार नव्हता. नाहीतर इतर व्यक्तीमध्ये कमीत कमी ३ आजार होते.