KKR vs PBKS highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर पंजाबच्या फलंदाजांचे तांडव! 262 धावांचे रेकॉर्ड ब्रेक आव्हान केलं चेस

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे. 

KKR vs PBKS highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर पंजाबच्या फलंदाजांचे तांडव! 262 धावांचे रेकॉर्ड ब्रेक आव्हान केलं चेस

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे, तर पंजाब किंग्सच्या संघाचा फॉर्म हा थोडा डगमगलेला आहे. पंजाबचा संघ अजूनही आपली गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर ही  10 पॉइंट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ 4 पॉइंट्स सोबत नवव्या स्थानावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआर आज पण आपला बेधडक खेळ खेळणार की, पंजाब किंग्स आज बाजी मारणार?

26 Apr 2024, 23:19 वाजता

पंजाब किंग्सच्या फलंदजांनी, इडन गार्डनवर आज रणांचे तूफान आणलं आहे. 8 बॉल बॉकी ठेवत पंजाबने तब्बल 262 धावांचे आव्हान चेस केले आहे आणि पॉइंट्स टेबलमध्ये महत्वाचे 2 पॉइंटस मिळवले आहेत

26 Apr 2024, 23:00 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये जॉनी बेयरस्टोने 45 बॉलमध्ये 8 चौकार आणि 8 षटकार मारून आपलं तडाखेदार शतक पूर्ण केलं आहे.   

26 Apr 2024, 22:49 वाजता

15 ओव्हरंतर पंजाब किंग्सचा स्कोर 201-2 असा आहे. बेयरस्टो हा 97 धावांवर खेळतोय, तर शशांक सिंग हा 19 धावांवर खेळत आहे. पंजाबला येथून 30 बॉलमध्ये 61 धावा लागत आहेत.

26 Apr 2024, 22:42 वाजता

पंजाबला 13 व्या ओव्हरमध्ये राईली रूसोच्या रूपात दुसरा झटका लागला आहे. रूसो हो 26 धावांवर बाद झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर शशांक सिंग हा फलंदाजीसाठी आलाय.

26 Apr 2024, 22:27 वाजता

10 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 132-1 असा आहे. बेयरस्टो हा 57 धावांवर, तर रूसो हा 19 धावांवर खेळत आहे. या स्थितीतून पंजाबला  60 बॉलमध्ये 130 धावांची गरज आहे.

26 Apr 2024, 22:23 वाजता

पंजाबच्या जॉनी बेयरस्टोने 9 व्या ओव्हरमध्ये फक्त 24 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

26 Apr 2024, 22:08 वाजता

6 व्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला आहे. धाकड खेळी खेळत असणारा प्रभसिमरन सिंग हा 54 धावांवर आउट झाला आहे. त्याने आपल्या इनिंगमध्ये 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. पहिल्या विकेटनंतर राईली रूसो हा फलंदाजीसाठी आलाय. 

26 Apr 2024, 22:02 वाजता

5 ओव्हरनंतर पंजाबच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात दिली आहे. प्रभसिमरन सिंगने फक्त 18 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलंय, तर बेयरस्टो पण 22 धावांवर खेळत आहे.

26 Apr 2024, 21:25 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर 262 धावांचे आव्हान दिलं आहे.  केकेआरकडून सॉल्टने 75, नरेनने 71, रसलने 24, श्रेयस अय्यरने 28, तर वेंकटेश अय्यरने 39 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत पंजाब किंग्सकडून  अर्शदिप सिंगने 2, सॅम करनने, हर्षल पटेल आणि राहूल चहर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, पंजाब किंग्सचे फलंदाज आज तडाखेबाज फलंदाजी करून 262  धावांचा डोंगर पार करणार, की केकेआरच इडन गार्डनवर आपले वर्चस्व दाखवआर?

26 Apr 2024, 20:58 वाजता

अर्शदिप सिंगने 16 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल याला 24 धावांवर बाद केलं आहे. रसलने आपल्या या छोट्या पण घातक खेळीमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार मारले होते.