भारतीय नोटांवरील 'या' जागा नक्की कुठे आहेत? जाणून घ्या

Indian Rupees: भारतामध्ये 1 रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंतच्या नोटा आहेत. यातल्या एक, दोन आणि पाच रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद झाल्या आहेत. पण प्रत्येक नोटीच्या मागे एक छायाचित्र आहे.  भारतातील प्रसिद्ध जागा असून त्यांना ऐतिहासिक महत्व आहे. 

Apr 22, 2024, 21:43 PM IST

Indian Rupees: भारतामध्ये 1 रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंतच्या नोटा आहेत. यातल्या एक, दोन आणि पाच रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद झाल्या आहेत. पण प्रत्येक नोटीच्या मागे एक छायाचित्र आहे.  भारतातील प्रसिद्ध जागा असून त्यांना ऐतिहासिक महत्व आहे. 

1/7

10 रुपयांच्या नोटवर पुढे महात्मा गांधी तर मागे कोणार्कचे सूर्यमंदिर आहे.  ओरीसातील पुरी शहरापासून ईशान्येस सुमारे 35 किलोमीटर  कोणार्क येथे 13व्या शतकातील  हे हिंदू सूर्य मंदिर आहे. या मंदिराला सूर्य देवालय असंही म्हटलं जातं. हे ओडिशा वास्तुकला किंवा कलिंग वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे    

2/7

20 रुपयांच्या नोटवर तुम्हाला महाराष्ट्रतील प्रसिध्द वेरुळच्या लेणीचे छायाचित्र आहे. छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 किमी अंतरावरील वेरूळ गावात या जगप्रसिद्ध लेणी आहेत.  सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत

3/7

50 नोटेवर कर्नाटकमधलं हम्पी मंदिर आहे.  कर्नाटकमध्ये 15 व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेल्या हंपी या जागतिक वारसा यादीतील शहरातील प्राचीन मंदिराचा फोटो आहे.

4/7

100 रुपयांच्या नोटवर तुम्हाला गुजरात राज्यातील राणीचा वाव म्हणजे प्रसिध्द विहिर आहे. 2014 साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोनं दिला आहे.

5/7

200 रुपयांच्या नोटवर प्रसिद्ध सांची स्तूपाचे छायाचित्र आहे.   मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून 45 कि.मी. तर विदिशापासून 9 कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.

6/7

500 रुपयांच्या नोटवर लाल किल्ल्याचे छायाचित्र आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहानने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.

7/7

2000 हजारांच्या नोटवर भारताच्या मंगळयानाचे छायाचित्र आहे. मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा इथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने 5 नोव्हेंहर 2013 रोजी प्रक्षेपित केले गेलं. हे छायाचित्र भारतातील वैज्ञानिक समृध्दीचे दर्शन घडवतात.