Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आज होणाऱ्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

26 Apr 2024, 07:14 वाजता

Lok Sabha Election Phase 2: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले मतदान

बेंगळुरूतील मतदान केंद्रावर जाऊन नारायण मूर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकात 14 जागांवर आज मतदान होत आहे. 

26 Apr 2024, 07:11 वाजता

Lok Sabha Election Phase 2: तुमचे मत, तुमचा आवाज; मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट

 

26 Apr 2024, 07:08 वाजता

Lok Sabha Election Phase 2: तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतीलः रामदास तडस

वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी आज राहत्या घरी पूजा करून देवाकडे साकडं घातलं आहे. सगळ्यांनी मतदान करावं..आणि तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान बनतील, असा विश्वास रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.

26 Apr 2024, 07:04 वाजता

Lok Sabha Election Phase 2: नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

नांदेड लोकसभेसाठी आजा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  नांदेड लोकसभा क्षेत्रात 18 लाख 51 हजार मतदार आहेत. काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या 23 उमेदवारांच्या भवीतव्याचा फैसला आज मतदार राजा करणार आहे.

26 Apr 2024, 06:55 वाजता

Lok Sabha Election Phase 2: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आज मतदान

महाविकास आघाडी कडून संजय देशमुख व महायुतीकडून राजेश्री पाटील या दोन उमेदवारामध्ये लढत होणार आहे. सकाळी 7 वाजतापासून मतदार मतदानाला सुरुवात करणार आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात,वाशिम जिल्ह्यात एकूण 6 लाख 63 हजार 308 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे

 

26 Apr 2024, 06:31 वाजता

Lok Sabha Election Phase 2: अकोल्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

कोल्यात भाजप , काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. अकोल्यात 2056 मतदान केंद्रांवर 18 लाख 90 हजार 814 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.सध्या शेतीचे काम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजूर पहाटेपासून मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत.

26 Apr 2024, 06:24 वाजता

अमरावती लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३६ हजार ०७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क. जिल्ह्यात १ हजार ९८३ मतदान केंद्र. मेळघाटात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र

26 Apr 2024, 06:22 वाजता

Lok Sabha Election Phase 2: दुसऱ्या टप्प्यात 204 उमेदवार रिंगणात

देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 89 जागांवर आज मतदान होत आहे. राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्येही आजच मतदान होत आहे. 

26 Apr 2024, 06:21 वाजता

Lok Sabha Election Phase 2: महाराष्ट्रात आज 8 लोकसभा मतदारसंघात मतदान

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम हे पश्चिम विदर्भातील मतदारसंघ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे