Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला; उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल शुक्रवार होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला;  उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीची पडघम वाजलंय. येत्या 19 एप्रिल शुक्रवार देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ भाजपचा गड नागपूरसोबत रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाच्या जागवर उमेदवार कोण हा तिढा सुटला असला तरी काही ठिकाणी अजून आपल्या उमेदवार कोण हे मतदारांना अजून माहिती नाही. 

15 Apr 2024, 09:58 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज बैठक 

राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी आज 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे...या बैठकीला मनसे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत...राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार आहेत...यासाठी महायुतीतील नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे...ही समिती त्या त्या लोकसभा मतदारसंघातील नेत्यांशी संवाद साधून त्यांच्यासोबतच प्रचार करणार आहे...याच संदर्भात आजची बैठक होणार आहे...आणि यात समन्वयकांची यादी किंवा नाव देण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय...