Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला; उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल शुक्रवार होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला;  उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीची पडघम वाजलंय. येत्या 19 एप्रिल शुक्रवार देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ भाजपचा गड नागपूरसोबत रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाच्या जागवर उमेदवार कोण हा तिढा सुटला असला तरी काही ठिकाणी अजून आपल्या उमेदवार कोण हे मतदारांना अजून माहिती नाही. 

15 Apr 2024, 10:26 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा दिवस

आज अर्ज भरण्याचा दिवस आहे... सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मविआ आणि महायुतीचे नेते उमेदवारी अर्ज भरणारेत. साता-यातून शशिकांत शिंदे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी शरद पवार उपस्थित राहणारेत. महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने देखील आज अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. मविआ मात्र आज अर्जही दाखल करतील. विनायक राऊत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरतील. रायगडमधून अनंत गिते देखील आज अर्ज भरतील.

 

15 Apr 2024, 10:24 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  संभाजीनगरमध्ये आज ओवेसींच्या दोन सभा 

संभाजीनगरमध्ये आज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींच्या दोन सभा होणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता वैजापूरमध्ये आणि रात्री 8 वाजता कन्नडमध्ये सभा होणार आहेत. 

 

15 Apr 2024, 10:23 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुमसरमध्ये

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसर मध्ये येणार आहेत.  तुमसर नगर परिषद ग्राऊंडवर दुपारी फडणवीसांची जाहीर सभा होणारेय.

 

15 Apr 2024, 10:21 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  कोल्हापुरात संजय मंडलिक आणि धैर्यशिल माने यांचं आज शक्तिप्रदर्शन 

आज कोल्हापुरात संजय मंडलिक आणि धैर्यशिल माने शक्तिप्रदर्शन करणार आहे. गांधी मैदान ते कलेक्लटर ऑफीस अशी रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत . तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

 

15 Apr 2024, 10:05 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  चंद्रहार पाटील यांचा सांगलीत आज मेळावा

शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा आज सांगलीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांसह मविआचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सांगलीतल्या भावे नाट्यगृहात या मेळाव्याचं आय़ोजन करण्यात आलंय.

 

15 Apr 2024, 10:04 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  अजित पवार आज बारामतीमध्ये 

आज अजित पवारांचा बारामती दौरा असणार आहे. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय.

 

15 Apr 2024, 10:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  शरद पवार यांच्या सभांचा धडाका

शरद पवारांच्या आज दोन सभा होणार आहेत. साता-यात शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार त्याठिकाणी शक्तिप्रदर्शन करत त्यांची पहिली सभा होणार आहे. तर दुसरी सभा बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ असणार आहे. दौंड तालुक्यातील यवत इथे दुपारी चार वाजता  शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. 

 

15 Apr 2024, 10:02 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  शशिकांत शिंदे यांचं आज मोठं शक्तिप्रदर्शन 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आज मोठं शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणारेत. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित असतील. अर्ज भरण्याआधी शशिकांत शिंदे रॅली काढणारेत. साता-यातील गांधी मैदानावरून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल तर पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन सांगता होईल.

 

15 Apr 2024, 09:59 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची आज पत्रकार परिषद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची नागपुरात पत्रकार परिषद होणार आहे... भाजपाच्या जाहीरनाम्याला अनुसरून पत्रकार परिषद असल्याचा भाजपकडून सांगण्यात येत आहे... अजूनही काही जागांवर महायुतीचा न सुटलेला तिढा याबाबत फडणवीस काही बोलतात का याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल...

 

15 Apr 2024, 09:59 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची आज पत्रकार परिषद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची नागपुरात पत्रकार परिषद होणार आहे... भाजपाच्या जाहीरनाम्याला अनुसरून पत्रकार परिषद असल्याचा भाजपकडून सांगण्यात येत आहे... अजूनही काही जागांवर महायुतीचा न सुटलेला तिढा याबाबत फडणवीस काही बोलतात का याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल...