लोकप्रिय लव्हस्टोरी ते घटस्फोटापर्यंत पोहोचलं शिखर धवनच नातं, नात्यामध्ये अजिबात करु नका या चुका

Relationship Tips : नातं टिकवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. सुरुवातीच्या अगदी आकंठ प्रेमात बुडालेले दोन व्यक्ती एकमेकांपासून असे वेगळे होतात की ते पाहणं त्रासदायक होतं. अशावेळी नेमकं काय चुकतं हे आपण  पण आता नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यासाठी आपण IPL 2024 मधील पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याच्या नात्यातून शिकणार आहोत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 5, 2024, 12:06 PM IST
लोकप्रिय लव्हस्टोरी ते घटस्फोटापर्यंत पोहोचलं शिखर धवनच नातं, नात्यामध्ये अजिबात करु नका या चुका  title=

सध्या IPL 2024 वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. यामधील काही क्रिकेटर्स आपल्या लग्नांमुळे देखील जास्त चर्चेत राहिले. क्रिकेटर्सचे अफेअर्स ते घटस्फोट या सगळ्याची चर्चा होते. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय खेळाडू शिखर धवनची.

आयपीएलमध्ये पंजाब संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या धवनची प्रेमकहाणी खूपच विचित्र आहे. आधी तो त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या फेसबुकवर प्रेमात पडला आणि नंतर मतभेद झाल्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. आधी प्रेमविवाह आणि नंतर घटस्फोट! असे काय झाले की या प्रेमळ जोडप्याचे नाते टिकले नाही? तुम्ही त्याच चुका पुन्हा करत आहात का?

फेसबुकवालं प्रेम

शिखर धवन आणि आएशा मुखर्जी यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. या दोघांचं नातं भारतीय गोलंदाज हरभजन सिंह यांच्यामुळे जवळ आलं. कारण आएशा ही हरभजनची मैत्रीण होती. धवनने फेसबुकवर आएशाचे प्रोफाईल पाहिल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आएशानेही ती ऍक्स्पेक्ट केली. हळूहळू यांची मैत्री पुढे वाढत गेली आणि 2012 मध्ये दोघांनी लग्न केले.

मग का झालं लग्न 

आएशा आधीच घटस्फोटित होती. शिखरशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीपासूनच्या दोन मुलींमुळे आयशा ऑस्ट्रेलियात राहत होती. याचे कारण असेही होते की तिने आपल्या पतीला वचन दिले होते की ती मुलांची काळजी घेईल. शिखरसोबत लग्न झाल्यानंतर 2013 मध्ये मुलगा जोरावरचा जन्म झाला तेव्हा तोही ऑस्ट्रेलियात राहू लागला. यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला होता. अखेर दोघांनीही इन्स्टाग्राम पोस्टमधून घटस्फोट झाल्याची माहिती दिली. 

या दोघांचं नातं इतकं पुढे जाऊन का तुटलं. शिखर आणि आयशाने कोणत्या चुका केल्या ज्या आपण आपल्या नात्यामध्ये टाळू शकतो. 

संवाद कमी होतो तेव्हा 

नात्यामध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. अशावेळी नात्यामधील दुरावा अधिक वाढतो. एखाद्या जोडप्यामध्ये नीट संवाद साधता येत नसेल तर ते भविष्यात घटस्फोटाचे कारण बनू शकते. गोष्टी लपवणे, गैरसमज असणे, राग दीर्घकाळ टिकवून ठेवणे इत्यादी गोष्टी तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये दरी निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे नाते घटस्फोटापर्यंत जाण्यापासून वाचवायचे असेल, तर तुमच्या भावना, गरजा आणि इच्छा उघडपणे आणि प्रामाणिकपणे शेअर करा. तसेच एकमेकांना वेळ द्या, यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ देणार नाही आणि यामुळे तुमचे प्रेम आणखी घट्ट होईल.

अविश्वास 

नात्यामध्ये दुरावा येण्याचं दुसरं कारण आहे अविश्वास, धोका. जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याचा विश्वासघात करतो तेव्हा ते नातेसंबंध तुटण्यास कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर तुमच्या पार्टनरला कधीही फसवू नका. तुमची एक चूक नातेसंबंधात अविश्वास, तणाव आणि शंका निर्माण करते, जी समोरच्या व्यक्तीला माफ करणे खूप कठीण असते.