छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहित नसलेल्या 10 खास गोष्टी

Sambhaji Maharaj Unknown Facts: छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी. आपल्या पराक्रमाने मराठ्यांचं साम्राज्य वाढवणाऱ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 12, 2024, 03:59 PM IST
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहित नसलेल्या 10 खास गोष्टी  title=

Sambhaji Maharaj Unknown Facts: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहिली ती छत्रपती संभाजी राजे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या जशा अनेक गाथा सांगितल्या जातात त्याचप्रमाणे एका गद्दार व्यक्तीमुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या तावडीत जिवंत सापडले आणि त्यांनी धर्म परिवर्तनाला नकार दिल्यामुळे औरंगजेबाने त्यांचे केलेले हाल आणि त्यांची हत्या याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. मात्र या महापराक्रमी व्यक्तीने आपल्या जेमतेम ९ वर्षांच्या स्वराज्याच्या कारकीर्दीत मोगल, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना चांगलंच जेरीस आणलं होतं.

संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल 9 अनोखी गोष्टी 

  1. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी राजांच्या आईसाहेब सईबाईंचं अकाली निधन झालं. त्यानंतर माता जिजाऊं साहेबांनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले. जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाची महिलेने संभाजी महाराजांचे संगोपन केले.
  2. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज तर केवळ 23 व्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती झाले.
  3. राजकारण अगदी कमी वयातच शिकण्याची संभाजी महाराजांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुघल दरबार आणि तिथं होणारं राजकारण कसं असतं हे अगदी बालपणीच पाहिलं होतं.
  4. केवळ चौदाव्या-पंधराव्या वर्षी संभाजी राजांनी साहित्य, कविता यांच्यात रस घेतला आणि याच काळात छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित झाले. बुधभूषणम या संस्कृत ग्रंथासह इतर भाषेतले तीन ग्रंथही छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहीले.
  5. शिवाजी महाराजांसोबत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी संभाजी राजे आग्र्याला गेले. त्यानंतर आग्र्याहून सुटकेचा एकएक क्षण त्यांनी आपल्या पित्यासोबत अनुभवला. आग्रा येथून सुटका करून घेऊन शिवाजी राजे मजल दरमजल करत राजधानीत परतले. पण सुरक्षिततेसाठी संभाजी राजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आलं होतं.
  6. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. रायगडावरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  7. 16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मुघल सम्राट औरंगजेबाला वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल. पण रायगडच्या सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज बसताच औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजीकडून पराभूत झाला.
  8. छत्रपती संभाजी महाराजांकडून  वारंवार पराभवानंतर, सम्राट औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली. तो मुघलांना जाऊन सामील झाला.
  9. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र केशव राजकीय कार्यानिमित्त संगमेश्वरातून रायगडावर परत जात असताना संभाजींवर रागावलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीं महाराजांना आपल्या ताब्यात घेऊन क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
  10. त्यांची जीभ कापली आणि डोळे काढले.  तुळापूरच्या नदीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे विकृत तुकडे फेकले असता काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवण टाकून पूर्ण पध्दतीने अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते. अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले.