पाच दशकांचा मतदारसंघ का सोडला? राहुल गांधींचा रायबरेलतीतून उमेदवारी अर्ज दाखल

Loksabha 2024, Congress, Rahul Gandhi, Raebareli, Raebareli Constituency Amethi lok sabha seat, KL Sharma, राहुल गांधी, अमेठी लोकसभा सीट, केएल शर्मा, किशोरी लाल शर्मा, काँग्रेस

राजीव कासले | Updated: May 3, 2024, 04:22 PM IST
पाच दशकांचा मतदारसंघ का सोडला? राहुल गांधींचा रायबरेलतीतून उमेदवारी अर्ज दाखल title=

Rahul Gandhi : कांग्रेस नेते रहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तरप्रदेशच्या रायबरेली (Raebareli) मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. गांधी-नेहरी कुटुंबाच्या या पारंपारिक मतदारसंघातून आतापर्यंत सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. तर राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढत होते. यावेळी या मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा यांच्यावर काँग्रेसने विश्वास टाकला आहे. अमेठीऐवजी यावेळी राहुल गांधींनी रायबरेलीतून मतदारसंघाची निवड केली. केरळमधील वायनाडपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीची निवड करून काँग्रेस आणि राहुल गांधींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली का निवडली, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

का निवडली रायबरेली? 
रायबरेली. नेहरू-गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज गांधी यांच्यापासून सोनिया गांधींपर्यत तब्बल 16 वेळा गांधी-नेहरू कुटुंबातील व्यक्ती इथून खासदार म्हणून विजयी झालीय. 1977 मध्ये जनता पार्टीच्या राज नारायण यांनी रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव केला होता. मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी तिथून पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या. 2004 पासून लागोपाठ पाचवेळा सोनिया गांधी इथून खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणातून सोनियांनी संन्यास घेतल्यानंतर आता रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभा लढवत आहेत.

राहुल गांधी यांनी अमेठी का सोडली?
गेली पाच दशकं गांधी परिवार अमेठी मतदारसंघातन निवडणूक लढवत होतं. याला आता पूर्णविराम लागला आहे. राहुल गांधी यांनी 2019 पासून अमेठी मतदारसंघापासून फारकत घेतली आहेत. आता 2024 मध्येही गांधी कुटुंबातला सदस्य अमेठीतून उमेदवार नाही.  राहुल गांधी 2004 पासून लागोपाठ तीनवेळा उत्तर प्रदेशच्या अमेठीचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2019 साली केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींनी त्यांचा पराभव केला. राहुल गांधींऐवजी आता अमेठीतून काँग्रेसनं गांधी घराण्याचे विश्वासू के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिलीय..

रायबरेली मतदारसंघावर नेहरू- गांधी कुटुंबाचं वर्चस्व राहीलं आहे. 1951  ची निवडणूक रायबरेली आणि प्रतापगढ अशा दोन मतदारसंघाचा मिळून एक मतदारसंघ होता. इथून इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी निवडून आले आहेत. या मतदारसंघात एकूण 16 वेळा नेहरू- गांधी कुटुंबातील व्यक्ती निवडून आला आहे. फिरोज गांधीं नंतर इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याकडे हा मतदारसंघ राहीला. इंदिरा गांधींनी 1967, 1971, 1977 आणि 1980 मध्ये निवडणूक लढवली. आणिबाणी नंतर 1977 ला झालेल्या निवडणूकीत भारतीय लोक दलाचे उमेदवार राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. राजनारायण हे रायबरेलीतून निवडून येणारे पहिले बिगर काँग्रेसी खासदार होते.

राहुल गांधी यांच्यासमोर आव्हान
लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून गांधी घराण्यातील व्यक्ती न लढणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारं आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडला. परंतू रायबरेलीतून निवडून येण्याचं आव्हान राहुल गांधी समोर असणार आहे.