ऋजुता दिवेकर सांगतेय, नवरात्रीच्या दिवसांमध्ये आवर्जून खा 3 पदार्थ, महिलांचे आरोग्य सुधारेल

Rujuta Diwekar on Navratri Foods : नवरात्रीच्या दिवसांमध्ये (Navratri 2023)अनेक महिला उपवास करतात. अशावेळी तुम्ही काय खाल्लं पाहिजे हा प्रश्न कायम स्त्रियांना पडत असतो. अशावेळी महिलांनी ऋजुताने सांगितलेल्या 3 पदार्थांचा आहारात समावेश करावा. जेणे करून आरोग्य उत्तम राहिते.(Rujuta Diwekar 3 Foods For Navratri Fasting)

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 18, 2023, 04:26 PM IST
ऋजुता दिवेकर सांगतेय, नवरात्रीच्या दिवसांमध्ये आवर्जून खा 3 पदार्थ, महिलांचे आरोग्य सुधारेल title=

Rujuta Diwekar on Women Health : नवरात्रोत्सवाचा आजचा चौथा दिवस. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणारे अनेकजण आहेत. यामध्ये असंख्य महिलांचा समावेश आहे. नऊ दिवसांत उपवास असल्यावर शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवासासोबतच जर तुमचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत झाली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे ऋजुता दिवेकरने 3 टिप्स शेअर केल्या आहेत. ज्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यावर तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही उत्तम राहतात. 

ऋजुता दिवेकरच्या या टिप्स फॉलो केल्यावर शरीरात काय बदल होतात, ते जाणून घ्या. आणि त्या पदार्थांचे आरोग्यासाठी काय फायदे असतात, ते समजून घ्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

शिंगाडा 

शिंगाडा हा पदार्थ उपवासासाठी अतिशय गुणकारी आहे. शिंगाड्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच 
त्वचा देखील उत्तम राहण्यास मदत होते. शिंगाड्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होते. तसेच टॉन्सिल्स आणि वेदनेपासून आराम मिळवू शकता. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दात आणि हाडे मजबूत करतील शिंगाडा. तसेच गॅस आणि अपचनापासून शिंगाड्यामुळे आराम मिळतो. शिंगाड्याची चपाती, छिला, स्नॅक्स, कढी, भाजी अशा वेगवेगळ्या स्वरुपात खाऊ शकता. 

कुट्टुचे पीठ 

कुट्टुचे पीठ देखील नवरात्रीच्या दिवसांत फायदेशीर ठरते. हे पीठ पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांत चांगली तब्बेत राहण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे कुट्टू, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुट्टू पीठ मदत करते. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य, पोटाचे आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी हे पीठ मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. ब्रेन हेल्थ, मासिक पाळीच्या आधी त्रास होत असेल कुट्टूचे पीठ नक्की खा. 

चण्याची डाळ 

नवरात्रीत चण्याची डाळ भिजवून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. चण्याच्या डाळीमध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये याचे सेवन करावे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या डाळीची मदत होते तसेच अशक्तपणा, कावीळ, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. 
चणे भिजवून उकडून खा