अखेर कुशल बद्रिके आणि पत्नीची झाली भेट; का आला होता दुरावा?

अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आला आहे. यामुळे कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. गेले अनेक दिवस कुशलची पत्नी सुनैना बद्रिके त्याच्यापासून दूर होती. 

Updated: Aug 31, 2023, 03:33 PM IST
अखेर कुशल बद्रिके आणि पत्नीची झाली भेट; का आला होता दुरावा?   title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो चला हवा येवू द्यामधून घरा-घरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आला आहे. यामुळे कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. गेले अनेक दिवस कुशलची पत्नी सुनैना बद्रिके त्याच्यापासून दूर होती. पण यामागचं कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आनंद होईल. कुशलची पत्नी गेले ३ते ४ महिने अमेरिकेत होती. खरंतर कुशलची पत्नी एक उत्तम कथ्थक डान्सर आहे. आणि याच माध्यमातून ती अमेरिकेला गेली होती. गेले अनेक महिने कुशलने त्याच्या पत्नीच्या आठवणीतल्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. मोठ्या दुराव्यानंतर ही जोडीची नुकतीच भेट झाली आहे.

नुकतीच सुनैना भारतात बऱ्याच महिन्यांनंतर भारतात परतली आहे. या संदर्भातील माहिती स्वत: अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. याचपाठोपाठ दिग्दर्शक विजू माने यांनी देखील एक गंमतिशीर पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्रामस्टोरीवर शेअर केली आहे. सुनयना 'मुघल-ए-आझम' या रंगभूमीवरील महानाट्यात काम करताना दिसत आहे. त्याच निमित्तानं या नाटकाची संपूर्ण टीम ही अमेरिका दौऱ्यासाठी गेली आहे. त्यात सुनयना एक होती. आता सुनयना भारतात आल्यानंतर कुशल खूप आनंदी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपुर्वी कुशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या व्हिडीओत कुशलची पत्नी सुनयना ही अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर सुरु असलेल्या फ्लॅश मॉबमध्ये होती. हा फ्लॅश मॉब मुघल-ए-आझमसाठी होता.  व्हिडीओ शेअर करत कुशलनं ''मोठी कामगिरी, मोठी कामगिरी म्हणतात ना ती हीच… अभिनंदन मुघल-ए-आझमची टीम'', असं कॅप्शन दिलं होतं.  'मुघल-ए-आझम' या नाटकाचे दिग्दर्शन फिरोज अब्बास यांनी केलं आहे.

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असलेला कॉमेडी कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. फक्त मराठी नाही तर बॉलिवूड कलाकार देखील त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे पोहोचतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांचे मने जिंकली आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके. कुशल ज्या प्रमाणे एक कलाकार आहे त्याच प्रमाणे त्याची पत्नी सुनयना देखील एक कलाकार असून ती एक उत्तम कथ्थक डान्सर आहे.