दीपिकाने नव्या वर्षी सोशल मीडियावरून डिलीट केले पोस्ट

चाहत्यांना मोठा धक्कादायक  

Updated: Jan 1, 2021, 11:51 AM IST
दीपिकाने नव्या वर्षी सोशल मीडियावरून डिलीट केले पोस्ट title=

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादूकोणने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिने सोशल मीडियावरून सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरून सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलीट केले आहेत. तिने हा टोकाचा पाऊल का उचलला याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत आहे. याआधी दीपिकाने असं कधीही केलं नव्हतं. दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंह सध्या राजस्थानमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट करत आहेत. 

सांगायचं झालं तर सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. इंस्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे फेसबुक आणि ट्विटरवर तिचे फॉलोअर्स अधिक आहेत. 

सोशल मीडियावर प्रोफाइल फोटोमध्ये तिचा फोटो होता मात्र अता त्याठिकाणी ‘इंडिया टुडे’ मॅगझीनचा कव्हर फोटो आहे. दीपिकाचा अकाउंट हॅक झाला आहे की आगामी चित्रपटाच्या प्रमेशनसाठी दीपिकाने हे पाऊल उचललं आहे, हे अद्याप समोर आले नाही.

दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या 'महाभारत' आणि 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय ती अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत देखील स्क्रिन शेअर करणार आहे. मात्र या चित्रपटाच्या शिर्षकावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.