झी मराठीवर लवकरच दोन कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी

नवे शो प्रेक्षकांच्या भेटीला 

झी मराठीवर लवकरच दोन कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी title=

मुंबई : झी मराठी ही वाहिनी 'जिथे मराठी, तिथे झी मराठी' या धोरणाप्रमाणेच जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या रसिक प्रेक्षकांचे गेल्या २ दशकांपासून अविरत मनोरंजन करत आली आहे. झी मराठी ही फक्त एक वाहिनी राहिली नसून ती प्रत्येक घरातील एक अविभाज्य घटक झाली आहे आहे. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते  आणि ‘रात्री जागो मोहन प्यारे’ मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात.

‘लागिरं झालं जी’, 'तुला पाहते रे' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजालीची’ मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.

झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच झी मराठीवर चला हवा येऊ द्या, आम्ही सारे खवय्ये आणि होम मिनिस्टर नंतर अजून २ नव्या कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत. फावल्यावेळात सर्वांचं मनोरंजन करणारा खेळ म्हणजे गाण्यांच्या भेंड्या आणि हाच खेळ झी मराठी एका कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. तसंच दुसरा कार्यक्रम हा एक चॅट शो असणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच सुत्रसंचालन अनुक्रमे आदेश बांदेकर आणि संजय मोने करणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे पण प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन हे कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस सादर होणार आहेत हे मात्र नक्की. 

या कार्यक्रमांबद्दल बोलताना झी मराठीचे व्यवसाय प्रमुख श्री. निलेश मयेकर म्हणाले, "झी मराठी ही वाहिनी जगभरातील रसिक प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे आणि प्रेक्षकांची मनोरंजनाची गरज लक्षात घेता एका पेक्षा एक कार्यक्रम या वाहिनीने प्रेक्षकांसाठी सादर केले. चला हवा येऊ द्या या कथाबाह्य कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आम्ही प्रेक्षकांसाठी अजून २ नवीन कथाबाह्य कार्यक्रम सादर करत आहोत. हे कार्यक्रम वेगळे असून प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजित करतील. लवकरच या कार्यक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात येईल."