'त्या चित्रपटात मी अमिताभला भूमिका दिल्याने दाऊदने...'; निर्मात्याने सांगितला दाऊद भेटीचा किस्सा

Dawood Ibrahim About Amitabh Bachchan Role: अमिताभ बच्चन यांचा एक गाजलेला चित्रपट अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमने अनेकदा पाहिल्याचं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र ही गोष्ट खरी आहे. दाऊदने हा चित्रपट पाहिल्याचंही स्वत: सांगितलं होतं. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात...

| May 05, 2024, 16:04 PM IST
1/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

मुंबईत 90 च्या दशकात अंडरवर्ल्डची दहशत होती. अर्थात मुंबईत ही दहशत असल्याने त्याचा थेट परिणाम मनोरंजनसृष्टीवर म्हणजेच बॉलिवूडवरही होत होता. हा काळ असा होता जेव्हा मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार दहशतीमध्येच होते. खंडणीसाठी फोनवर धमकावणे असो किंवा अगदी गोळीबार झाल्याच्या घटनाही बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर घडल्याची उदाहरणं आहेत. (प्रातिनिधिक फोटो)  

2/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

अर्थात हा काळ आता संपुष्टात आला असला तरी एप्रिल महिन्यामध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा मनोरंजनसृष्टीला गुंडगिरीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या जखमेवरची खपली काढली गेली असून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

3/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

'जी सेव्हन मल्टीप्लेक्स' आणि 'मराठा मंदिर'चे कार्यकारी निर्देशक मनोज देसाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशीच एक जुनी आठवण सांगितली आहे. देसाई यांनी एका आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भेटल्याचं म्हटलं आहे.

4/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडगोळीतील लक्ष्मीकांत) यांच्या घरी ही भेट झाली होती असंही देसाई यांनी म्हटलं आहे. 'फिल्मी फिव्हर' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये देसाई यांनी दाऊदचा उल्लेख 'दाऊदजी' असा करत हा किस्सा सांगितला. 

5/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

देसाई यांना दाऊदचा तुम्ही आदर्थी उल्लेख का करत आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देसाई यांनी, 'मला त्यांचा दाऊदजी असाच उल्लेख करावा लागेल. मराठा मंदिर त्यांच्याच परिसरात आहे,' असं उत्तर दिलं. 

6/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

'मराठा मंदिर' हे मुंबईतील आयकॉनिक थेअटर सेंट्रलजवळ आहे. हा परिसर दाऊद ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झाला त्या डोंगरीपासून जवळ आहे. हेच देसाई यांना सूचित करायचं होतं.

7/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

तुम्ही कधी दाऊदला भेटला होता का? या प्रश्नावर देसाई यांनी होकारार्थी उत्तर देत नेमकी ही भेट कशी झाली होती होती हे सांगितलं.  

8/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

"मी त्यांना माझा 'खुदा गवाह' (1992) चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळेस भेटलो होतो. आम्ही जवळपास 5 मिनिटं लक्ष्मीकांतजींच्या घरी भेटलो. 'खुदा गवाह' पाहून त्यांना आंदन झाला होता," असं देसाईंनी सांगितलं.

9/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

"'खुदा गवाह'मध्ये अफगाणी पाठणच्या भूमिकेत मी अमिताभ बच्चन यांची निवड केल्याबद्दल त्यांनी (दाऊदने) समाधानही व्यक्त केलं," असंही देसाई म्हणाले.

10/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

"मला वाटतं त्यांनी (दाऊदने) लक्ष्मीकांतजींच्या वाढदिवसाच्या दिवशी बोलताना, 'आम्ही खुदा गवाह दोन वेळा पाहिला आहे आणि तरीही आमचं मन तृप्त झालेलं नाही,' असं म्हटलं होतं," अशी माहितीही देसाई यांनी दिली.

11/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

'खुदा गवाह' चित्रपटाचं शुटींग खऱ्याखुऱ्या लोकेशनवर व्हावं अशी अमिताभ यांची इच्छा असल्याने त्याकाळी दहशतीच्या सावटाखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये जाऊन या चित्रपटाचं शुटींग पूर्ण करण्यात आलं होतं.

12/12

Don Dawood Ibrahim Amitabh Bachchan Khuda Gawah

अमिताभ बच्चन, श्रीदेवी, डॅनी डेम्पोन्झा, शिल्पा शिरोडकर, नागार्जून आणि किरण कुमार यांनी या चित्रपटात अभिनय केला होता.