Tata Punch आणि Exter ला आता विसरा! हुंडाई आणतीये सर्वात स्वस्त SUV; किंमत असेल फक्त...

Hyundai आता बाजारपेठेत आपली नवी परडवणारी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. हुंडाईने नुकतंच CASPER नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे.   

May 15, 2024, 11:33 AM IST

Hyundai आता बाजारपेठेत आपली नवी परडवणारी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. हुंडाईने नुकतंच CASPER नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे. 

 

1/9

Hyundai ने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त एसयुव्ही Exter ला लाँच केलं होतं. या एसयुव्हीची किंमत 6.19 लाखांपासून सुरु होते.   

2/9

रिपोर्टनुसार, कंपनी आता बाजारपेठेत आपली नवी परडवणारी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. हुंडाईने नुकतंच CASPER नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे.   

3/9

CASPER नेमप्लेटचा ट्रेडमार्क केल्यानंतर तिच्याकडे Santro ची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात आहे. 2022 मध्ये कंपनीने ही कार बंद केली आहे.   

4/9

जर CASPER ला बाजारात आणलं तर ती EXTER च्या खालोखाल असेल आणि किंमतही कमी असेल अशी आशा आहे.   

5/9

दक्षिण कोरियन मार्केटमध्ये ही कार आधीपासूनच उपलब्ध आहे. पण जर ती भारतीय बाजारपेठेत लाँच झाली तर काही बदल केले जाऊ शकतात.   

6/9

जागतिक बाजारात असणाऱ्या CASPER ची लांबी 3595 मिमी, रुंदी 1595 मिमी आणि उंची 1575 मिमी आहे. यामध्ये 2400 मिमीचा व्हीलबेस मिळतो. Exter च्या तुलनेत ही छोटी आहे.  

7/9

लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचं गेल्यास ही टॉल ब्वॉय हॅचबॅकप्रमाणे दिसते, जी SUV प्रमाणे स्टाईल केली आहे. हिला K1 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. ज्याच्यावर Santro आणि i10 Nios आधारित आहेत.  

8/9

या एसयुव्हीत कंपनीने 1.0 लीटर क्षमेतचं नॅच्यूरल एस्पिरेटेड MPI पेट्रोल इंजिन आणि 1.0 लीटरचं T-GDI टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन दिलं आहे.   

9/9

हुंडाईने अद्याप या एसयुव्हीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ग्राहकांच्या खिशाला परवडणारी कार म्हणून तिला सादर केलं जाऊ शकतं. हिची किंमतही त्यानंतरच जाहीर होईल.