Pune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमी

Female Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. 

सौरभ तळेकर | Updated: May 12, 2024, 07:54 PM IST
Pune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमी title=
Paragliding Accident In Jejuri

Paragliding Accident In Pune : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri) येथे आज सायंकाळी पॅराग्लायडिंग (Paragliding Accident) एका घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात पुण्यातील सतरा वर्षीय आस्था प्रदीप माने ही तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. जखमी तरुणीला खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत. पॅराग्लायडिंग करणारा चालकाला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिस (Pune Police) घटनास्थळावर पोहोचले असून प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. भारतात पॅराग्लायडिंगचे नियमन केले जात नाही, त्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच घटना घडली होती. बीडमधील वैजनाथ येथे पॅराग्लायडिंग करताना महिला पायलटचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आता अपघातातून वाचण्यासाठी नियमावली कधी लागू होणार? असा सवाल विचारला जातोय.

पॅराग्लायडिंग करताना काय काळजी घ्याल?

पॅराग्लायडिंग वैमानिकांनी त्यांच्या अनुभवाची पातळी दर्शविण्यासाठी लॉगबुक राखणे अपेक्षित आहे. पॅराग्लायडिंग वैमानिकांकडे आवश्यक शिक्षण असणं आवश्यक आहे आणि त्यांना दोन वर्षांचा उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तुमचा पायलट आणि तुम्ही निवडत असलेल्या कंपनीकडे योग्य उपकरणे आहेत याचीही तुम्हाला खात्री करणं आवश्यक आहे. 

तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी पॅराग्लायडिंग दरम्यान तुमचा फोन वापरणं टाळा.  पायलटसोबत तुमचे ब्रीफिंग काळजीपूर्वक ऐकणं महत्त्वाचं आहे. घाबरू नका कारण तुम्ही तज्ञांच्या देखरेखीखाली आहात. तुमच्या पायलटवर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. दिलेल्या सुचना देखील ऐकणे आणि पालन करणं गरजेचं आहे.