SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरती

Government Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.

सौरभ तळेकर | Updated: May 11, 2024, 06:32 PM IST
SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरती title=
Government Jobs 2024 SBI in hiring process of 12000 employees

SBI Recruitment : सरकारी नोकरी कोणाला नको असते. अनेकजण सरकारी नोकरीसाठी खटपट करत असतात. अशातच बँकेत नोकरीच्या (Bank Job Vacancy) शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) बंपर भरती करण्यात येणार आहे. शंभर दोनशे नव्हे तर तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रकिया होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी गुरुवारी दिली. आयटीसोबतच या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकांबद्दल प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेत एसबीआयमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षातील 2 लाख 35 हजार 858 कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता एसबीआयने भरती प्रकिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 11,000 ते 12,000 कर्मचारी भरती प्रक्रियेत आहेत, जे सामान्य कर्मचारी आहेत, अशी माहिती दिनेश खारा यांनी दिली.

बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी तंत्रज्ञान कौशल्याचा विचार करत आहे, असंही खारा यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा निव्वळ नफा 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. त्यानंतर बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, येत्या काळात तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.i ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवाराने करिअर लिंकवर क्लिक करावे आणि घोषणेवर जावे आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. आता तुम्हाला नवीन पृष्ठावरील नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.