अभिनेत्री करिना कपूरवर मोठं संकट; अडकली कायद्याच्या कचाट्यात

कायमच करिना बऱ्याच अडचणींचा सामना करताना दिसते. पुन्हा एकदा करिनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 

Updated: May 11, 2024, 06:54 PM IST
अभिनेत्री करिना कपूरवर मोठं संकट; अडकली कायद्याच्या कचाट्यात  title=

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. कायमच करिना बऱ्याच अडचणींचा सामना करताना दिसते. पुन्हा एकदा करिनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.  तीन वर्षापूर्वी लाँन्च झालेल्या पुस्तकामुळे अभिनेत्री कायदेशीर अडचणीत अडकली आहे. करिनाने जेहच्या जन्मावेळी एक पुस्तक लॉन्च केलं होतं मात्र या पुस्तकाच्या नावावरुन बराच वाद झाला होता. इतकंच नाही तर हे प्रकरण इतकं चिगळलं की, हे प्रकरण कोर्टातही पोहोचलं. कोर्टानेही आता अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे. 

करिनाच्या या पुस्तकाचं नाव  'करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल' आहे. या पुस्तकाच्या नावात बायबल शब्द वापरल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. एका वकिलांनी एमपी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता हायकोर्टाने या प्रकरणी अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे.

करिना कपूरवर आरोप
याचिकेत करिना कपूर खानवर आरोप लावला होता की, तिने बायबल शब्दाचा वापर करुन ईस्लाम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. अशातच  या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली होती.

जबलपूर सिविल लाइन निवासी क्रिस्टोफर एंथॉनीने सैफ अली खानची पत्नी करिनाच्या विरोधात कायदेशीररित्या तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. तिने ईस्लाम समाजाच्या भावना दुखावल्याचं बोललं जात आहे. ते म्हणाले की, अभिनेत्रीने स्वस्त लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने लोकांच्या भावना दुखावल्या जातील असंच पुस्तकाचं नाव ठेवलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता या याचिकेची सुनावणी केल्यानंतर जस्टिस गुरपाल सिंह अहलूवालिया यांच्या सिंगल जज बेंचने अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे. करिनाव्यतिरीक्त पुस्तक विकणारे सेलर्सलादेखील नोटीस पाठवण्यात आली आहे आता पुढील सुनावणी १ जुलैला होवू शकते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही क्रू या चित्रपटात झळकली होती. यात करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.