Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?

Gold Silver Price Today: मे महिन्यात अक्षय्य तृतीयासह अनेक शुभ मुहूर्त आहेत. अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदीसाठी जास्त कल असतो. मात्र त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 29, 2024, 12:00 PM IST
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव? title=

Gold Silver Price Today in Marathi: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. सोन्याचे दरात घसरण झाली असून सोने खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरापासून काहीसा दिलासा मिळत आहे. त्यातच मे महिन्यात अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण सोन्याचे दागिने विकत घेत असतात. मात्र त्यापूर्वीच सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

सोन्या-चांदीच्या किमती गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत होते. मात्र आता काहीसा किंमतीत घसरण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या वाढत्या दराचे सत्र सुरुच होते. दोन्ही मौल्यवान धातूचे दर विक्रमी उच्चांक गाठला होता. दरम्यान इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव धोक्यात आले असून भविष्यात दर आणखी घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव निम्म्याने कमी होऊन चांदीचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.

आजचे दर काय? 

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 71,550 रुपये आहे.  तर सराफा बाजार या वेबसाइटनुसार, चांदी 82,500 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 65,468 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तेच पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,468 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 71,420 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,468 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 71,420 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,468 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 71,420 रुपये आहे.

गेल्या दोन महिमातील ऐतिहासिक वाढीनंतर सोन्या-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून घसरण सुरू असून आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. एमसीएक्स सोमवारी सोने आणि चांदीच्या घसरणीसह उघडला. एकेकाळी सोन्याचा भाव सातत्याने 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलेला असायचा, मात्र सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण होताना दिसत आहे.