तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली

Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 28, 2023, 01:07 PM IST
तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली  title=
This man is taking 111 pills every day to look young has spent millions of dollars

Marathi Trending News: तरुण दिसण्यासाठी एका तरुणाने केलेले प्रयत्न पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. वाढते वय हे अनेकांसाठी धोक्याची घंटा असते. वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्वचा व शरीर चिरतरुण ठेवण्यासाठी आहारात बदल केले जातात तर अनेक गोळ्या किंवा औषधे घेतले जातात. अमेरिकेतही असाच एक प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील एका करोडपती उद्योजकावर तरुण दिसण्याचा असं काही वेड लागलं आहे की दिवसाला तो 111 गोळ्यांचे सेवन करतो. तर, यासाठी त्याने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. (Tips To Stay Young Forever)

१८ वर्षांच्या तरुण बनण्याची जिद्द

ब्रायन जॉनसन असं या व्यक्तीचे नाव आहे. वृद्धत्वापासून वाचण्यासाठी त्यांनी आपली कंपनीदेखील 80 कोटी डॉलरला विकली आहे. एका मुलाखतीतच त्याने हा खुलासा केला आहे. जॉनसनच्या म्हणण्यानुसार, ते विविध आरोग्य उपकरणांचा वापर करतो. तर, रोज शेकडो गोळ्यांचे सेवन करतो. त्याच्या शरीरातील सर्व अवयव 18 वर्षांच्या एका तरुणासारखे असावेत. उद्दष्ट्य पूर्ण करण्यासाठी मी काहीही करु शकतो, असं त्याने म्हटलं आहे. 

मुलाचे रक्त चढवले

जॉनसनला तरुण दिसण्याच्या वेडेपणाने इतके झपाटले आहे की त्याने स्वतःला मुलाचे रक्त चढवले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, असं केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहिल. 

तरुण दिसण्यासाठी 40 लाख डॉलर खर्च

तरुण बनण्याची ही इच्छा खूप जास्त खर्चिक ठरली आहे. जॉनसनने त्याच्या या पूर्ण प्रयत्नाला ब्लूप्रिंट असं नाव दिलं आहे. या पूर्ण प्रोजेक्टसाठी त्याने आत्तापर्यंत 40 लाख डॉलरहून अधिक खर्च केले आहेत. ब्लूप्रिंटच्या या प्रोजेक्टअंतर्गंत सर्व निर्णय जॉनसनचे डॉक्टर घेतात. तर, जॉनसनदेखील या नियमांचे कठोरपणे पालन करतात. त्यांच्यासाठी एक पौष्टिक आहार देखील तयार करण्यात आला आहे.