या मुली 'रेप' करण्यासारख्या नाहीत, शाळेतल्या मुलांनी बनवली यादी...धक्कादायक प्रकार

Shocking News : एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  11 विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलींची एक यादी तयार केली होती. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून एकच खळबळ उडाली आहे. 

राजीव कासले | Updated: May 6, 2024, 06:11 PM IST
या मुली 'रेप' करण्यासारख्या नाहीत, शाळेतल्या मुलांनी बनवली यादी...धक्कादायक प्रकार title=
प्रातिनिधिक फोटो

Shocking News : एका खासगी शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 11 विद्यार्थ्यांनी एक यादी तयारी केली होती. यात मुलींचं चक्क वर्गीकरण करण्यात आलं होतं. चांगल्या दिसऱ्या मुलींची आणि सामान्य दिसणाऱ्या मुलींचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. यासाठी क्यूटी (Cuties), वायफी (Wifey) असे शब्द वापरण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे यात या मुली रेप करण्यासाठी नाहीत (Unrapeable Girls), असाही एक ग्रुप बनवण्यात आला होता. त्यात शाळेतील काही मुलींची नाव टाकण्यात आली होती. ही यादी सोश मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाने पालकांना बोलावून आपातकालीन बैठकही घेतली.

शाळा प्रशासन हादरलं
या घटनेने शाळा प्रशासन हादरलं आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबर्नमधील एक मोठ्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली यादी सोशल मीडियावर लीक झाली. यात शाळेतील मुलींचा अपमानकारक उल्लेख करण्यात आला होता. शाळेतील मुलींना वायफीज, क्यूटीज आणि रेप करण्यासारख्या नाहीत, अशा गटात टाकण्यता आलं होतं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही यादी शाळेतीलच 11 विद्यार्थ्यांनी तयार केली होती. हा प्रकार बाहेर येताच शाळा प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावलं. यातल्या चार विद्यार्थ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

शाळेतीलच नाही तर कोणत्याही मुलीचा अशा प्रकारे अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. शाळेतील मुलींना अशा प्रकारे टार्गेट करणं खूपच चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. हा खूप क्रूर आणि घृणास्पद प्रकार असून आरोपी विद्यार्थ्यांवर कोणताही दयामाया दाखवली जाणार नाही असंही शाळेच्या मुख्याध्यपकांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं काऊन्सीलिंग केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रेवन्नाविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस
दरम्यान, भारतात खळबळ उडवून देणाऱ्या कर्नाटकातील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. रेवन्नाला भारताता आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात आहे. आरोपी प्रज्वल रेवन्नाच्या घरात एक पेन ड्राईव्ह सापडला असून यात तब्बल 2976 आपत्तीजनक व्हिडिओ सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे यात काही सरकारी नोकरीत असलेल्या महिलांचेही अश्लील व्हिडिओ आहेत. या व्हिडिओंची धमकी देऊन पीडित महिलांना ब्लॅकमेल तसंच त्यांचं लैगिंक शोषण केलं जात होतं.