जगभरात कोरोनाचा विळखा; १६ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण

जगातील एकूण 213 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. 

Updated: Apr 11, 2020, 10:37 PM IST
जगभरात कोरोनाचा विळखा; १६ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील 200हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. अमेरिकासारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. भारतातही कोरोनाचे 8 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 

संपूर्ण जगभरात आतापर्यंत 1,676, 265 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 103,660 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 20.8 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 3 लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील एकूण 213 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, इटली दुसऱ्या तर स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 501,010 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसांत जवळपास 2 हजारहून अधिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनामुळे 19600 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये 152,271 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 18,845 हून अधिक कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. तर 32,534 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

स्पेनमध्ये 161852 कोरोनारुग्ण आढळले आहेत. तर 16,350हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

इराणमध्ये गेल्या 24 तासांत 125 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 4357वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासांत 1837 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 70029वर गेला आहे. 

सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात शनिवारी 191 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सिंगापूरमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2299वर पोहचली आहे. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नेदरलँड्समध्ये शनिवारी 1316 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 24,413 वर पोहचला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. तर एकूण 2643 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

मलेशियामध्ये शनिवारी 184 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4530वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 73 जणांचा बळी गेला आहे. 44 टक्के लोक कोरोनातून बरे झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

इंग्लंडमध्ये गेल्या 24 तासांत 823 रुग्ण वाढले असून 8937 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

यूकेमध्ये शनिवारी 917 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा 9875वर गेला आहे. 

इंडोनेशियामध्ये शनिवारी नवे 330 रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3842वर पोहचली असल्याचं आरोग्य मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.