आज 214 कोटींचा मालक मात्र तेव्हा रोहितसाठी कुटुंबाकडे 275 रुपयेही नव्हते; पण त्याच 275 रुपयांनी बदललं आयुष्य

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात

मात्र रोहितचं बालपण मध्यमवर्गीय कुटुंबातचं गेलं.

214 कोटींची संपत्ती

रोहित शर्माची एकूण संपत्ती म्हणजे नेट वर्थ 214 कोटी इतकी असल्याचा एक अंदाज आहे.

तेव्हा कुटुंबाकडे रोहितसाठी 275 रुपयेही नव्हते

मात्र एक काळ असाही होता की रोहित शर्माच्या कुटुंबाकडे रोहितला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी फीचे 275 रुपयेही नव्हते.

आजी-आजोबांबरोबर राहत होता

आर्थिक चणचण असल्याने रोहित शर्मा त्याच्या आई-वडिलांऐवजी डोंबिवलीऐवजी आजी-आजोबांबरोबर बोरिवलीला राहत होता.

फलंदाजी पाहून प्रभावित

क्रिकेटपटू सिद्धेश लाडचे वडील आणि प्रशिक्षक दिनेश लाड हे एकदा उन्हाळी शिबिरामध्ये रोहित शर्माची फलंदाजी पाहून प्रभावित झाले.

शाळा बदलण्याचा सल्ला

दिनेश लाड यांनी रोहित शर्माला शाळा बदलून त्यांच्या शाळेत दाखला घेण्याचं सुचवलं.

रोहितच्या वडिलांनी विनंती फेटाळली

मात्र रोहित शर्माच्या वडिलांनी दिनेश लाड यांची ही विनंती फेटाळू लावली आणि मुलाची शाळा बदलणार नाही असं सांगितलं.

कारण ठरली शाळेची फी

रोहितच्या वडिलांनी नकार देण्यामागील कारण होतं शाळेची फी! रोहित ज्या शाळेत होता तिथे फी 30 रुपये होती.

एवढी फी परवडणार नाही

दिनेश लाड यांच्या शाळेची फी 275 रुपये होती. एवढी फी आपल्याला परवडणार नाही, असं रोहितच्या वडिलांचं म्हणणं होतं.

रोहितला प्रवेश मिळवून दिला

मात्र काहीही करुन रोहितला शाळेत दाखला मिळवून द्यायचा असं ठरवलेल्या दिनेश लाड यांनी मुख्यध्यापकांना विशेष विनंती करुन सवलतीच्या दरात रोहितला दाखला मिळवून दिला.

आयुष्य बदललं

रोहित शर्माने दिनेश लाड यांच्या प्रशिक्षणाखाली खेळण्यास सुरुवात केली आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं.

द्रोणाचार्य पुरस्कार

रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना नुकताच द्रोणाचार्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story