प्ले ऑफची चुरस

IPL 2024 मध्ये आतापर्यंत 68 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि हैदराबादने प्ले ऑफमध्ये एन्ट्री केली आहे.

युवा खेळाडूंची छाप

आयपीएलच्या सतराव्या हंगामात काही युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. टीम इंडियाचं भविष्य म्हणून या खेळाडूंकडे पाहिलं जातंय.

रियान पराग

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने 13 सामन्यात 531 धावा केल्यात. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थानच्या प्ले ऑफपर्यंतच्या प्रवासात परागने दमदार कामगिरी केलीय.

शशांक सिंह

पंजाब किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरी पंजाबचा आक्रमक फलंदाज शशांक सिंहने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. शशांकने 13 सामन्यात 352 धावा केल्या.

आशुतोष शर्मा

पंजाब किंग्सचा आणखी एक युवा अनकॅप्ड खेळाडू म्हणजे आशुतोश शर्मा. मॅच फिनिशर म्हणून आशुतोषने छाप उमटवली आहे. आशुतोषने 10 सामन्यात 187 धावा केल्यात.

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्मा सनरायजर्स हैदाराबाद संघाचा हुकमी खेळाडू बनला आहे. अभिषेक आणि ट्रेव्हिस हेडने हैदराबादला तुफानी सुरुवात करुन दिलीय. अभिषेकने 12 सामन्यात 401 धावा केल्यात.

साई सुदर्शन

गुजरात टायटन्सचा आक्रमक युवा फलंदाज साई सुदर्शननेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साई सुदर्शनने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात तब्बल 527 धावा केल्यात. यात एका शतकाचाही समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story