प्रकाशावर चालणारा AC, कमी विजेत उन्हाळा जाईल गारव्यात

उन्हाळा सुरु झाल्यामुळे अनेकांना एसीची गरज भासते. जास्त एसी चालवल्याने विजेचे बीलदेखील जास्त येते. तुम्ही एसीचा उपयोग करुन विजेचे बीलही कमी आले तर?

मार्केटमध्ये सोलर एसी आले असून ते प्रकाशातून पॉवर घेतात. यामुळे विजेच्या बिलातून दिलासा मिळतो.

भारतीय बाजारामध्ये नेक्सस सोलर एनर्जीचे एसी आले आहेत. त्यांच्या वेबसाइटवर अनेक पर्याय मिळतात.

नेक्स वनकूल वन एक्स स्प्लिट एसी तुम्हाला 35 हजार रुपयात मिळेल. याला वायफाय सपोर्ट मिळेल.

या एसीमध्ये कनेक्टीव्हीटी मिळेल. तुम्ही फोनमधून एसी कंट्रोल करु शकता. होम डिवाइसनेदेखील हे कंट्रोल होऊ शकेल.

यात ड्युअल कम्प्रेसरचे कूलर येते. यात विजेचे बील कमी येते. तसेच हे एअर प्युरियाफरचे काम करते.

या एसीची आवाजदेखील कमी येतो. म्हणजे तुमची झोपमोडदेखील होणार नाही.

हा एसी फाईव्ह स्टार रोटींगचा आहे. तसेच यामध्ये अनेक कुलिंग मोड येतात. यासोबत एका वर्षाची वॉरंटी मिळते.

कंपनी 5 वर्षांची कम्प्रेसर वॉरंटी देते. हायरदेखील काही दिवसात आपला सोलर एसी आणणार आहे.

सोलर एसीसाठी सोलर पॅनल आणि बॅटरीची गरज लागेल. यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story