वजन कमी करण्यासाठी तुम्हीही रात्रीचं जेवण बंद केलं आहे का? जाणून घ्या धोके

वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण रात्रीचं जेवण टाळतात. पण असं केल्याने त्यामुळे शरिराला आपण अनेक धोके निर्माण करतो.

रात्रीचं जेवण केलं नाही तर त्याचा मेटाबॉलिजमवर परिणाम होऊ शकतो. आपल्या शरिराला पोषकतत्वांची कमतरता जाणवू शकते.

तुमच्या झोपेवरही याचा परिणाम होऊ शकतो. तसंच अनेक आजार बळावू शकतात.

रात्री न जेवल्यास तुमची खाण्याची इच्छा वाढू शकते. यामुळे पुढील वेळी खाताना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त अन्न खात ओव्हरइटिंगचे बळी ठरु शकता.

वेळेत जेवण केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं.

रात्रीचं जेवण सोडल्यास तुमच्या मेटाबॉलिजमवर परिणाम होतो. जे ब्लड शुगरच्या पातळीत चढ उतार होण्यास कारणीभूत ठरु शकतात.

जर तुम्ही योग्य प्रमाणात जेवला नाहीत तर शरीर एनर्जीसाठी मसल्स टिश्यूजचा वापर करतं.

त्यामुळे तुम्ही नियमितपणे रात्रीचं जेवण बंद केलं तर मसल्स लॉस होऊ शकतोय

रात्री भूकेल्या पोटी झोपल्याने त्याचा मूड आणि एनर्जीवर परिणाम होतो. तसंच तणावात वाढ होते.

VIEW ALL

Read Next Story