'ही' भारतीय अभिनेत्री सोबत येणार असेल तर कारगील सोडतो! पाकिस्तानी सैन्याने दिलेली ऑफर

आघाडीच्या अभिनेत्रींचं वर्चस्व

दिपिका पादुकोण आणि करिना कपूरसारख्या आघाडीच्या अभिनेत्री सध्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

अभिनेत्यांइतकं महत्त्व अभिनेत्रींना

मागील काही काळापासून अभिनेत्यांइतकं महत्त्व अभिनेत्रींनाही प्राप्त झालं आहे. त्यामुळे त्यांनाही उत्तम भूमिका आणि मानधन दिलं जातंय.

एका अभिनेत्रीने चाहत्यांना वेड लावलं

मात्र दिपिका आणि करिना यांनी बॉलिवूडवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याआधी 1990 च्या दशकामध्ये एका अभिनेत्रीने बॉलिवूड चाहत्यांना वेड लावलं होतं.

पहिला चित्रपट फ्लॉप

या अभिनेत्रीचं नाव आहे माधुरी दिक्षीत! 1984 साली 'अबोध' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला.

स्वत:ची जागा निर्माण केली

मात्र माधुरी काम करत राहिली आणि हळूहळू तिने स्वत:ची जागा निर्माण केली. नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात जागा मिळवली.

अनेक सुपरहीट चित्रपट दिले

80 च्या दशकात 'तेजाब' वगळता सातत्याने अपयश आल्यानंतर 90 च्या दशकामध्ये माधुरीने 'दिल', 'बेटा', 'हम आपके हैं कौन..!' आणि 'दिल तो पागल है' सारखे सुपरहीट चित्रपट दिले.

एवढी लोकप्रियता वाढली की...

90 च्या दशकामध्ये माधुरीची क्रेझ एवढी वाढली की तिला बुरखा परिधान करुन स्वत:चे चित्रपट पाहायला जावं लागायचं.

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

90 च्या दशकामध्ये एकेकाळी माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.

पाकिस्तानमध्येही होती लोकप्रिय

माधुरीची लोकप्रियता अगदी पाकिस्तानमध्येही होती. माधुरीची पाकिस्तानी लष्करी सैन्यामध्येही प्रचंड क्रेझ होती.

पाकिस्तानी सैन्यातही इतकी क्रेझ की...

कारगील युद्धामध्ये पाकिस्तानी लष्कराने भारताचा ताब्यात घेतलेला प्रांत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र एकच अट त्यांनी ठेवली होती. ती अट म्हणजे माधुरीने आमच्याबरोबर यावं!

1999 मध्ये लग्न

माधुरीने 1999 साली डॉ. श्रीराम नेनेंबरोबर लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे.

नुकतीच या चित्रपटात झळकली

माधुरी मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 'मज्जा मा' चित्रपटात झळकली होती.

VIEW ALL

Read Next Story