शाहरुखच्या टीमचं टेन्शन वाढलं; 'हा' खेळाडू IPL सोडून मायदेशी परतणार

कोलकाता नाईट रायडर्सचं 2024 च्या आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन असून, त्यांनी 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत.

अशातच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला मोठा धक्का बसला.

अफगानी विकेटकीपर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज मायदेशी परतला, त्यामुळे कोलकता नाईट रायडर्स टीमचं टेन्शन वाढलय.

रहमानुल्लाह गुरबाजच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे त्याला मायदेशी परतावं लागलं.

गुरबाज आठवड्यानंतर टीमसोबत पुन्हा दिसेल, अशी आशा व्यक्त केली आहे .

गुरबाजनं 2024 च्या आयपीएलमध्ये सध्यातरी एकही सामना खेळला नाही आहे.

इंग्लिश खेळाडू फिल सॉल्ट प्लेऑफ सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे टीमला रहमानुल्लाह गुरबाजची गरज भासू शकते.

सध्या सॉल्ट सुनील नरीनसोबत ओपनिंग करतोय, आणि त्याने 9 मॅचमध्ये 392 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story