50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; Vivo Y28 5G भारतात लाँच, मिळतोय तब्बल इतक्या हजारांचा डिस्काऊंट

Vivo Y28 5G भारतात लाँच झाला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. या मोबाईल फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 8, 2024, 07:03 PM IST
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; Vivo Y28 5G भारतात लाँच, मिळतोय तब्बल इतक्या हजारांचा डिस्काऊंट title=

Vivo ने भारतात नवा स्मार्टफोन Y28 5G लाँच केला आहे. हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा 5G आहे. हा वाय सीरिजचा स्मार्टफोन आहे आणि Vivo Y27 चं अपग्रेड व्हेरियंट आहे जे गतवर्षी लाँच करण्यात आलं होतं. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. Vivo Y28 5G च्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Vivo Y28 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y28 5G मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ (1612 × 720 pixel) रेजोल्यूशनसह येतो. यामध्ये 269ppi पिक्सल डेन्सिटी मिळते. हा फोन 90Hz च्या रिफ्रेश रेट्ससह येतो. इसमें वॉटरड्रॉप नॉचचा वापर करण्यात आला आहे. 

Vivo Y28 5G  चा प्रोसेसर आणि रॅम 

Vivo Y28 5G मध्ये MediaTek Dimensity 6020 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो Mali G57 GPU सह येतो. इसमें 4GB/6GB/8GB LPDDR4X RAM आणि 8GB extended RAM चा पर्याय मिळतो. यामध्ये 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळतो. 

कॅमेरा सेटअप 

Vivo Y28 5G में ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. सेकंडरी कॅमेरा 2MP चा आहे, जो f/2.4 Aperture सह येतो. यामध्ये LED flash लाइट देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा सेल्फी कॅमरा आहे.

बॅटरी आणि इतर फिचर्स 

Vivo Y28 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W च्या फास्ट चार्जरसह येते. लॉक स्मार्टफोनला अनलॉक करण्यासाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हा फोन FunTouch OS 13 वर आधारित Android 13 वर काम करतो. 

किंमत आणि ऑफर्स

Vivo Y28 5G चं प्राथमिक व्हेरियंट 4GB + 128GB स्टोरेजमध्ये येतं, ज्याची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. Vivo Y28 6GB + 128GB ची किंमत कीमत 15 हजार 999 रुपये आहे. तर Vivo Y28 8GB + 128GB ची किंमत 16 हाजर 999 रुपये आहे. SBI आणि IDFC Bank च्या कार्डचा वापर केल्यास 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.