बाबो! तब्बल 108MP कॅमेरा; 50MP चा सेल्फी कॅमेरा; लाँच झाला दमदार फोन; किंमतीचा फक्त अंदाज लावू शकता

Honor Magic 6 Series Launch: ऑनरने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Honor Magic 6 आणि Magic 6 Pro ला लाँच केलं आहे, जे Snapdragon 8 Gen 3  प्रोसेसरसह येतात. या सीरीजमध्ये कंपनीने 108MP चा पेरिस्कोप लेन्स दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 12, 2024, 01:11 PM IST
बाबो! तब्बल 108MP कॅमेरा; 50MP चा सेल्फी कॅमेरा; लाँच झाला दमदार फोन; किंमतीचा फक्त अंदाज लावू शकता title=

Honor ने आपल्या स्मार्टफोन सीरीजमध्ये Honor Magic 6 ला लाँच केलं आहे. कंपनीने या सीरीजला Magic 5 चा सक्सेसर असल्याच्या रुपात लाँच केलं आहे. या स्मार्टफोन सीरिजमध्ये मागील सीरिजप्रमाणे डिझाइन पाहायला मिळत आहे. कंपनीने चीनमध्ये या सीरिजला लाँच केलं आहे. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन Honor Magic 6 आणि Magic 6 Pro मिळतात. दोन्ही स्मार्टफोन तीन-तीन कॉन्फिग्रेशनसह येतात. हा स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता कमीच आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची सविस्तर माहिती तसंच किंमत किती असेल याबद्दल...

किंमत किती?

Honor Magic 6 चा बेस व्हेरियंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह येतो. या व्हेरियंटची किंमत 4399 युआन (जवळपास 51,430 रुपये) आहे. तर याचा टॉप व्हेरियंट 16GB RAM + 512GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 4,999 युआन (जवळपास 59,380 रुपये) आहे. 

प्रो व्हेरियंटबद्दल बोलायचं गेल्यास याचं बेस वेरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह येतं. याची किंमत 5699 युआन (जवळपास 67,695 रुपये) आहे. तर टॉप व्हेरियंट 16GB RAM + 1TB स्टोरेजसह येतो. यासाठी 6699 युआन (जवळपास 78,320 रुपये) मोजावे लागतील. 

फिचर्स काय आहेत?

Honor Magic 6 Pro मध्ये 6.8 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असणारा कर्व्ड OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा हँडसेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. यामध्ये Android 14 आधारित Magic UI 8 मिळतो. 

स्मार्टफोनमध्ये 50MP + 50MP + 108MP चा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटला कंपनीने 50MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये 5600mAh ची बॅटरी आणि 80W ची वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. 

तर Magic 6 मध्ये 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. हादेखील Snapdragon 8 Gen 3 वर काम करतो. यामध्ये 50MP + 50MP + 32MP चा ट्रिपल रेअर कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा मोबाईल 5450mAh च्या बॅटरीसह येतो.