मोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर

Car Loan Interest Rate  : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही  पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.   

Updated: Jan 7, 2024, 05:59 PM IST
मोठी बातमी! कार घेणे होणार महाग!  3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर title=

Car Loan Interest Rate News In Marathi : तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अनेकांनी नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी अनेकजण कार लोन घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र या नवीन वर्षात कार लोन घेणे आता महाग होणार आहे. कारण देशातील तीन बँकांनी कार लोनवरील व्याजदर वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न सुद्धा महाग होणार असे चित्र दिसत आहे.

वाढत्या महागाईमुळे महिन्यासाठी येणारा पगार हा संसाराचा गाडा हाकण्यातच संपू लागला आहे. परिणामी घर, वाहन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी आता नागरिकांना नाईलाजाने कर्ज घ्यावे लागत आहे. याशिवाय अन्य काही वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी अनेक लोक पर्सनल लोन सुद्धा घेत आहेत. दरम्यान कार लोन घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील तीन बड्या बँकांनी कार लोन वरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने कार लोन वरील व्याजदर वाढवले आहे. यासोबतच बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेने देखील कार लोनवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आपण एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेने कार लोन वरील व्याजदर किती टक्क्यांनी वाढवले आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँकेने किती वाढवले व्याजदर?

SBI बँकेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, वाहन कर्जावर 0.25 % एवढी वाढ करण्यात आली आहे. आता उच्च सिबिल स्कोअर असलेल्या लोकांकडून वाहन कर्जावर 8.85 टक्के व्याज आकारले जाणार आहे. पूर्वी हा दर 8.65 टक्के होता. तर बँक ऑफ या बँकेने वाहन कर्जाचे व्याजदर 8.7 टक्क्यांवरून 8.8 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आहे. यासोबतच या बँकेने या प्रकारच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारण्याचा निर्णय देखील घेतला आहे. याशिवाय, युनियन बँकेने सुद्धा वाहन कर्जवरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. पूर्वी ही बँक केवळ 8.75 टक्के दराने वाहन कर्ज उपलब्ध करून देत होती मात्र आता वाहन कर्जासाठी आता सदर बँकेच्या माध्यमातून 9.15 टक्के एवढा व्याजदर आकारला जात आहे.