विराट-अनुष्का विवाहबंधनात, पाहा लग्न सोहळ्यातील काही खास फोटोज

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 11, 2017, 11:10 PM IST
विराट-अनुष्का विवाहबंधनात, पाहा लग्न सोहळ्यातील काही खास फोटोज title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.

PHOTOS For Virat Kohli Weds Anushka Sharma
Image Credit: Twitter

विराट-अनुष्का यांच्या लग्नासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून विविध बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण,  इटलीमध्ये विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले. यावेळी त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

Virat Kohli Weds Anushka Sharma, See Pics
Image Credit: Twitter

विराट आणि अनुष्का या दोघांनीही ट्विटरवरून त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. यावेळी दोघांनीही ट्विटरवर आपले फोटोजही शेअर केले आहेत.

Virat Kohli Weds Anushka Sharma, Watch Pictures
Image Credit: Twitter

विराट आणि अनुष्काने सोशल मीडियात काही फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये विराट कोहली आपल्या नातेवाईकांसोबत आणि अनुष्कासोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

Virat Kohli, Anushka Sharma, Wedding Pictures
Image Credit: Twitter

एका फोटोत अनुष्का शर्मा विराट कोहलीला हार घालताना दिसत आहे. मात्र, त्याच दरम्यान विराटला त्याच्या मित्रांनी वर उचलल्याचं दिसत आहे.

Virat Kohli, Anushka Sharma, Marriage Pictures
Image Credit: Twitter

विराट आणि अनुष्का हे इटलीहून थेट दक्षिण आफ्रिकेला जातील. त्या ठिकाणी आगामी काळात होणाऱ्या सीरिजसाठी विराट प्रॅक्टीस करणार आहे. तर, अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत नववर्ष सेलिब्रेट करणार आहे.

Anushka Sharma Virat Kohli Marriage Pictures
Image Credit: Twitter

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहानंतर दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Anushka Sharma Virat Kohli Wedding Pictures
Image Credit: Twitter

२१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. २१ तारखेचे दिल्लीतील रिसेप्शन हे त्यांच्या नातेवाईकांसाठी असणार आहे.

Watch, Anushka Sharma Virat Kohli Wedding Pictures
Image Credit: Twitter

मुंबईत आयोजित २६ डिसेंबरचं रिसेप्शन हे क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी असणार आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं जवळपास चार वर्ष अफेअर सुरु होतं.