या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...

Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...

नेहा चौधरी | Updated: Nov 5, 2023, 03:45 AM IST
या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli... title=
virat kohli birthday emotional tale of how virat kohli dealt with his fathers death but he played match cricket

Happy Birthday Virat Kohli : वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) आता खऱ्या अर्थाने रंगत स्थितीत आला आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री निश्चित झाली आहे. आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रीका सामना रंगणार आहे. भारताचा स्टार फलंदाज किंग कोहली म्हणजे विराट कोहली आज त्याचा 35वा वाढदिवस साजरा करतोय. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विराटने 48 शतकं ठोकले आहे आता आजच्या सामन्यात तो शतकं ठोकणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. (virat kohli birthday emotional tale of how virat kohli dealt with his fathers death but he played match cricket)

पण कायम मैदानात फलंदाजीने फटाके फोडणारा आणि सह खेळाडूंसोबत गंमती जमती करणारा, हसरा चेहऱ्याचा हा किंग कोहली एकेकाळी कोलमडून पडला होता. 2006 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान विराटच्या कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली. त्यावेळी त्याची काय अवस्थ झाली होती याचा खुलासा एकदा त्याने एका मुलाखतीत केला होता. 

कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून कर्नाटक विरुद्ध सामना खेळत होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कोहलीच्या डोक्यावरील वडिलांची सावली हरपली होती. दुसऱ्या दिवसीचा खेळ संपला तेव्हा विराट आणि पुनीत बिष्ट नाबाद होते. पुनीत जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा एक भयान शांतता पसरली होती. विराटच्या डोळ्यात पाणी होते. त्यांच्या वडिलांचं ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झालं होतं. 

हेसुद्धा वाचा - #HappyBirthdayKingKohli : किंग कोहली एका वर्षात किती कमावतो?

त्यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार मिथुन आणि प्रशिक्षक चेतन चौहान यांनी कोहलीला मायदेशी जाण्यास सांगितलं. तेव्हा प्रत्येकाला वाटलं एवढ्या लहान वयात तो हे दु:ख सहन करु शकणार नाही.  विराट कोहली त्यावेळी 18 वर्षांचा होता. कोहलीच्या आयुष्यातील हा पैलू खूप वेदनादायी होता, ज्याची फार कमी लोकांना माहिती आहे.

viratkohli

ती रात्र...

विराटने अमेरिकन क्रीडा पत्रकार ग्रॅहम बेन्सिंगर बोलताना सांगितलं की, भारतीय संघासाठी विराटला फलंदाजी करायची होती. तरदुसरीकडे वडिलांची प्रकृती फारच खालावली होती. त्या रात्री आम्ही जवळच्या डॉक्टरांकडे गेलो खरं, पण खूप उशीर झाल्यामुळे कोणीही दरवाजा उघडला नाही. मग आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्याचं पहाटे 2.30 वाजता निधन झालं. या बातमीनंतर घरातील सर्व जण रडू लागली पण माझ्या डोळ्यातून अश्रू येतं नव्हते मला काहीच समजतं नव्हतं. 19 डिसेंबर 2006 ती रात्र अतिशय भयानक होती. 

वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही विराट...

सकाळ झाली, आता विराटला फलंदाजी करण्यासाठी मैदानात जायचं होतं. सकाळी कोचला त्याने फोन केला आणि सगळं सांगितलं, आणि तोही हेही म्हणाला की, दिल्ली विरुद्ध कर्नाटकमधील सामन्यानंतरच तो वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणार असा निर्णय घेतला. तो एवढा खंबीर कसा असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

मी संघासाठी प्रथम फलंदाजी केली नंतर वडिलांचं अंत्यविधी केला. त्यानंतर मी माझ्या भावाला वचन दिलं की, मी टीम इंडियासाठी खेळणार. कारण वडिलांची इच्छा होती मी टीम इंडियासाठी खेळावं. त्या दिवसानंतर पहिले क्रिकेट नंतर गोष्टी या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आज किंग कोहलीने फक्त वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं नाही तर क्रिकेटविश्वात आपलं एकशेएक विक्रम करत जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं.