Rohit Sharma : मला नाही...; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित?

IPL 2023 Playoffs : रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या विजयानंतर मुंबईचा ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठण्याचा मार्ग कठीण झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, मुंबईची टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार का. यावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काय उत्त दिलंय पाहूयात.

Updated: May 19, 2023, 05:34 PM IST
Rohit Sharma : मला नाही...; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित? title=

MI IPL 2023 Playoffs Chance: आयपीएलमध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने सनरायझर्सवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर मुंबईचा ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठण्याचा मार्ग काहीसा खडतर झाल्याचं म्हटलं जातंय. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) यांच्यातील सामना जर मुंबईने जिंकला असता तर मुंबईचा मार्ग सुकर झाला. दरम्यान लखनऊ विरूद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहितला ( Rohit sharma ) टीम क्वालिफाय करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. 

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) करणार का प्लेऑफमध्ये एन्ट्री?

सद्य स्थितीला पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पाचव्या स्थानावर असणार आहे. मुंबईचा ( Mumbai Indians ) पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकला तर मुंबईचे 16 पॉईंट्स होणार आहे. दुसरीकडे हैदराबादविरुद्धच्या विजयामुळे 14 गुणांसहीत आरसीबीने चौथ्या स्थानी झेप घेतलीये. आरसीबीचं ( Royal Challengers Bangalore ) नेट रनरेट 0.180 आहे. मुंबईचे नेट रन रेट -0.128 असल्याने ते आता आरसीबीच्या खाली आहेत. 

लखनऊच्या सामन्यानंतर रोहित शर्माला ( Rohit sharma ) प्लेऑफविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, मला नाही माहिती की कॅल्कुलेशन कसं काम करेल. आम्हाला आता पुढचा सामना जिंकला पाहिजे. 

सनरायझर्सशी होणार पुढचा सामना

रविवारी 21 मे रोजी मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. जर मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर हैदराबादविरुद्धचा शेवटचा सामना मुंबईला किमान 79 रन्सने जिंकावा लागणार आहे. यामुळे मुंबईची टीम बंगळूरूच्या टीमच्या पुढे जाईल. 

आरसीबीच्या टीमला मिळणार भरपूर फायदा

या सिझनमध्ये आरसीबीची टीम प्लेऑफसाठी दावेदार मानली जातेय. आरसीबी आता अंतिम सामन्यात पराभूत झाला तरी तो क्वालिफाय होऊ शकते. मात्र यावेळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या टीम्सना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

राजस्थानच्या टीमने पंजाबचा पराभव केला आणि मुंबईची टीम आणि आरसीबी टीम शेवटच्या सामन्यांमध्ये पराभूत झाले तर राजस्थानच्या टीमला क्वालिफाय होण्याची संधी मिळणार आहे. नकारात्माक नेट रन रेट असलेल्याने पंजाब आणि राजस्थानला क्वालिफाय होण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत.