Real Madrid : अल्पवयीन मुलीचा सेक्स Video सोशल मीडियावर केला Viral, 4 खेळाडूंना अटक

Real Madrid Players Arrested : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिअल माद्रिदच्या चार तरुण खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. त्या चौघांवर अल्पवयीन मुलीचा सेक्सचा सोशल मीडियावर शेअर करण्याचा आरोप आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 15, 2023, 11:16 AM IST
Real Madrid : अल्पवयीन मुलीचा सेक्स Video सोशल मीडियावर केला Viral, 4 खेळाडूंना अटक title=
real madrid 4 players arrested minor girl sex video viral on whatsapp

Real Madrid Players Arrested : फुटबॉलमधील प्रसिद्ध टीम रिअल माद्रिदबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिअल माद्रिदच्या चार खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा सेक्स व्हिडीओ व्हाट्सअपवर शेअर केल्याचा आरोपाखाली त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पॅनिश पोलिसांनी या खेळाडूंना अटक केली असून त्यांचे फोन जप्त केले आहेत. (real madrid 4 players arrested minor girl sex video viral on whatsapp)

या बातमीने क्रीडा विश्वास खळबळ माजली असून Real Madrid चाहत्यांना धक्का बसला आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, या चौघांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्या घटनेचा व्हिडीओ व्हाट्सअपवर शेअर केल्याचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी या खेळांडूच्या मोबाईलमधील सर्च हिस्ट्री तपासली असून हा व्हिडीओ अजून व्हायरल होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या चौघांना चौकशीनंतर सोडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोप झालेले खेळाडूंपैकी तीन खेळाडू हे रिअर माद्रिदच्या सी टीमचे आहेत, तर एक बी टीमचा खेळाडू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पीडित 16 वर्षीय मुलीच्या आईने कॅनरी आयलँड्समधील पोलिसांकडे या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांना या खेळाडूंनी सांगितलं की, त्या मुलीच्या संमतीनंतर त्यांनी तिच्याशी संबंध ठेवले होते. तर व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि शेअरिंगबद्दल आम्हाला माहिती नसल्याचं बोलं जातं आहे.