मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन, आजारपणाशी झुंज ठरली अपयशी

Ashish Sakharkar Death : चार वेळा मिस्टर इंडिया आणि जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन झालं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 19, 2023, 01:48 PM IST
मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन, आजारपणाशी झुंज ठरली अपयशी  title=
mumbaikar marathi mr india fame bodybuilder ashish sakharkar passed away

Body Builder Ashish Sakharkar Death: बॉडीबिल्डिंग विश्वातील अत्यंत मोठं नाव आणि महाराष्ट्र श्रीपासून मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक स्पर्धेंवर नाव कोरणाऱ्या आशिष साखरकर यांचं निधन झालं आहे. आजारापणाशी झुंज आशिष यांची अपयशी ठरली. आशिष यांची देश विदेशात ख्याती होती. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून भारताचं नाव जगभरात प्रसिद्ध केले होते. मुंबईकर आशिषच्या असा जाण्यामुळे क्रिडा विश्वास शोककळा पसरली आहे.(mumbaikar marathi mr india fame bodybuilder ashish sakharkar passed away)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ashish 'The Expert' Sakharkar (@ashish.sakharkar01) द्वारा साझा की गई पोस्ट

आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आशिष हे प्रत्येक बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांसाठी आयकॉन होते. 

आशिष यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांच्या असंख्य चाहते आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आशिष साखरकर यांनी पटकावलेले पदकं

मिस्टर इंडिया विजेते - चार वेळा 
फेडरेशन कप विजेता - चार वेळा 
मिस्टर युनिव्हर्स -  रौप्य आणि कांस्य पदक
मिस्टर आशिया - रौप्य
युरोपियन चॅम्पियनशिप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटवरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्यांनी लिहलं आहे की, ''परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच साखरकर परिवारातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ''