MI vs KKR highlights, IPL 2024 : वानखेडेमध्ये केकेआरचा रॉयल विजय, मुंबई इंडियन्सविरूद्ध नोंदविला 24 धावांनी विजय

MI vs KKR Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना इन फॉर्म कोलकाता नाइट रायडर्सशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.   

MI vs KKR highlights, IPL 2024 : वानखेडेमध्ये केकेआरचा रॉयल विजय, मुंबई इंडियन्सविरूद्ध नोंदविला 24 धावांनी विजय

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झालेले नाहीये. आतापर्यंत मुंबईचा संघ 10 मधून फक्त 3 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तर पॉइंट्सटेबलमध्ये पण मुंबईचा संघ 9 व्या स्थानावर आहे. तर याउलट केकेआरचा संघ अतिशय दमदार फॉर्ममध्ये असून आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यांपैकी त्यांनी तब्बल 6 सामने जिंकलेले आहेत आणि विशेष म्हणजे, कोलकाताचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बघण्यायोग्य होणार की, वानखेडेच्या सपाट पिचवर कोणता संघ गोलंदाजांचा कस काढणार आणि आपल्या संघाचा विजयी झेंडा वानखेडेत फडकवणार आहे. 

3 May 2024, 22:56 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल याने मुंबई इंडियन्सचा सेट फलंदाज सुर्यकुमार यादव याला 56 धावांवर आउट केलं आहे. सातव्या विकेटनंतर कोएट्झे हा फलंदाजीसाठी आलाय.

3 May 2024, 22:51 वाजता

15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 119-6 असा आहे. मुंबई इंडियन्सला या स्थितीतून जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे.

3 May 2024, 22:48 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये मुंबईच्या सुर्यकुमार यादव याने 30 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

3 May 2024, 22:22 वाजता

10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 67-4 असा आहे. नेहाल वढेरा हा 5 धावांवर खेळतोय, तर सुर्यकुमार यादव हा 19 धावांवर खेळत आहे.

3 May 2024, 22:14 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये वरूण चक्रवर्तीने तिलक वर्माला फक्त 4 धावांवर आउट केलं आहे. तर चौथ्या विकेटनंतर नेहाल वढेरा हा फलंदाजीसाठी आला आहे.

3 May 2024, 22:02 वाजता

सुनील नरेन याने 6 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला 11 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. 

3 May 2024, 21:56 वाजता

5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 41-2 असा आहे. रोहित शर्मा हा 11 धावांवर खेळतोय, तर ,सुर्यकुमार यादव हा नुकताच फलंदाजीसाठी मैदानात आला आहे, तो ही 2 धावांवर खेळत आहे.

3 May 2024, 21:54 वाजता

वरूण चक्रवर्तीने 5 व्या ओव्हरमध्ये नमन धीरला 11 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला आहे.

3 May 2024, 21:41 वाजता

मिचेल स्टार्कने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इशान किशनला 13 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर नमन धीर हा फलंदाजीसाठी आला आहे.

3 May 2024, 21:18 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने, मुंबई इंडियन्ससमोर 170 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरकडून फलंदाजीत निराशाजन प्रदर्शन राहिले फक्त वेंकटेश अय्यर याने 70 धावांची खेळी खेळलीये, तर मनीष पांडे याने 42 धावांची इनिंग खेळलेली आहे. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहे, तर पांड्याने 2 आणि पियूष चावलाने 1 विकेट घेतलीये. 

आता बघण्यायोग्य असणार की मुंबईच्या होमग्राउंडवर कोलकाता हा सामना जिंकू शकणार? की मुंबई आपल्या तूफानी फलंदाजीचे प्रदर्शन करत सामना आपल्या खिशात टाकणार.