GT vs KKR Live Blog : गुजरातसमोर कोलकाताचं आव्हान, या कारणामुळे टॉसला उशिर

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : आयपीएसच्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. 

GT vs KKR Live Blog : गुजरातसमोर कोलकाताचं आव्हान, या कारणामुळे टॉसला उशिर

GT vs KKR Live Score in Marathi : गेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवला होता. त्याचबरोबर कोलकाता संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, आपले उर्वरित साखळी सामने जिंकून कोलकाता अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

13 May 2024, 21:12 वाजता

मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मात्र, पाच षटकांच्या सामन्यांची कट ऑफ वेळ रात्री १०.५६ पर्यंत आहे. अजून नाणेफेकही झालेली नसल्याने सामना होणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.

13 May 2024, 20:52 वाजता

मॅच रद्द झाली तर...?

आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर गुजरात टायटन्स आयपीएलच्या हंगामातून बाहेर होईल. तर केकेआर पाईंट्स टेबलच्या पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. गुजरात बाहेर गेल्याने दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्जला मोठा फायदा होणार आहे.

13 May 2024, 19:16 वाजता

पावसामुळे टॉसचा खोळंबा

अहमदाबादमध्ये खराब हवामानामुळे टॉसला उशीर झालाय. तिथे हलका पाऊस देखील पडतोय. यामुळे मैदान आणि खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे. काही वेळाने पाऊस थांबून सामना सुरू होण्याची शक्यता आहे. गुजरातसाठी हा करा किंवा मरो असा सामना आहे. सामना रद्द झाल्यास गुजरातचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे गुजरातचे चाहते पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना करत आहे.