हरभजन सिंगने GST वर केलं हटके ट्विट

भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरवर असं काही ट्विट केलं की ज्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 28, 2017, 03:40 PM IST
हरभजन सिंगने GST वर केलं हटके ट्विट title=
File Photo

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरवर असं काही ट्विट केलं की ज्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातला.

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग हा गेल्या काही दिवसांपासून ट्विटर अॅक्टीव्ह असल्याचं पहायला मिळत आहे. आता हरभजन सिंगने जीएसटीवर एक ट्विट केलं आणि हे ट्विट जबरदस्त व्हायरल झालं.

हरभजन सिंगने ट्विट करत म्हटलं की, "रेस्टॉरंटमध्ये डिनर केल्यावर जेव्हा बिल पेड करतो तेव्हा असं वाटतं की आपल्यासोबत केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही डिनर केलं आहे". हरजभन सिंगने केलेल्या या ट्विटनंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या ट्विटला आतापर्यंत २५ हजारांहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे तर जवळपास ९ हजारांहून अधिक रिट्विट करण्यात आले आहेत.

सध्या सुरु असलेल्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर मायकल क्लार्कने ट्विट केलं होतं. मायकल क्लार्कने केलेल्या ट्विटलाही हरभजन सिंगने उत्तर देत म्हटलं होतं की, मला वाटतं की तुम्हाला रिटायरमेंट सोडून पून्हा एकदा खेळण्यास सुरुवात केली पाहिजे.