VIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'

VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला...

नेहा चौधरी | Updated: Aug 26, 2023, 12:54 PM IST

Proposal Video : खेळाडूंच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो तो म्हणजे विजयाचा. विजयाचा हा क्षण त्यांसाठी आयुष्यातील मोलवान क्षण असतो डोळ्यात आणि जमिनीवर गुडघे टेकून आणि त्या क्षणाला धन्यवाद करतात.  बुडापेस्टमधील हंगेरीतील जागतिक चॅम्पियनशिपमधील एका महिला खेळाडूसाठी फिनिश लाइनवर पोहोचण्याचा क्षण दुहेरी आनंदाने रंगून गेला. 35 किमी रेस वॉकची अंतिम फेरी गाठणाऱ्या हाना बुर्झालोव्हा जेव्हा फिनिश लाइनवर आगळ वेगळं सप्रराइज मिळालं. (athlete proposes girlfriend at the finish line at world athletics championships video viral trending now)

35km to love!

झालं असं की जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 35km शर्यतीत रेसवॉकर डोमिनिक सेर्नी सुरुवात केली त्यानंतर खो देऊन महिला सहकारी हाना बुर्झालोव्हा ती स्पर्धा पुढे सुरु ठेवली. जेव्हा ती फिनिश लाइनवर पोहोचली आणि तिने अंतिम फेरी गाठली त्यानंतर डोमिनिक सेर्नी तिला सप्रराइज दिलं. 

 फिनिश लाइनवर गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केलं. अंगठी हातात घेऊन तिला लग्नासाठी मागणी घातली. सहकारीचं असं सप्रराइज पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिच्या आनंद गगणात मावत नव्हता. विजयाच्या आनंदासह प्रेमाचा दुहेरी आनंद ते दोघे त्यावेळी अनुभवत होते. या सुंदर आणि अस्मरणीय क्षणाचे हजारो साक्षीदार झाले. तिने त्याचा प्रेमाला होकार दिल्यावर डोमिनिकच्या आनंदाला पारा उरला नव्हता.

तिला उचलून घेऊन त्यांने तिला किस केलं आणि मैदानावर या प्रेमी जोडप्याचं प्रेम पाहून हजारो चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना व्वा व्वा दिली. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मधील हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामॅनही सरसावले. 

पत्रकारांशी बोलताना डोमिनिक म्हणाला की, ''आम्ही एका ऑलिम्पिक सायकल स्पर्धेच्या वेळी भेटलो त्यानंतर जवळजवळ आज चार वर्षे झाली आम्हाला एकत्र. त्यामुळे मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे.'' दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील worldathletics या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.