बुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता

Lakshmi Narayan And Kendra Trikon Yog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र एकत्र मिळून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय.

सुरभि जगदीश | Updated: Apr 24, 2024, 08:10 AM IST
बुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता title=

Lakshmi Narayan And Kendra Trikon Yog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राजयोग तयार होताना दिसतात. यावेळी बुद्धिमत्तेचा कारक असलेल्या बुध ग्रहाच्या राशीतील बदलाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. सध्या बुध मीन राशीत आहे. 10 मे रोजी संध्याकाळी 06:39 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे राक्षसांचा गुरू शुक्र आधीच मेष राशीत आहे.

अशा परिस्थितीत बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र एकत्र मिळून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. हा योग 10 मे ते 19 मे पर्यंत राहणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगांमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

मेष रास (Mesh Zodiac)

मेष राशीच्या घरामध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. थकीत पैसे मिळण्यासोबतच कर्जातूनही सुटका मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. पगारवाढीसह चांगली वाढ होऊ शकते. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा होणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीच्या लोकांना बुध आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. तुमचे बोलणे आणि विचार करण्याचे कौशल्य प्रत्येक क्षेत्रात तुमचा आदर आणि यश वाढवेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढतील. बेरोजगार लोकांना किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनावश्यक खर्चापासून दिलासा मिळेल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा करिअरमध्ये प्रगतीसह पूर्ण होऊ शकते. 

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण आणि केंद्र त्रिकोण राजयोग फायदेशीर ठरू शकतात. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात. शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )