श्री श्री रविशंकर यांचं नाव 'रवि' कसं पडलं माहितीय? 10 इंटरेस्टिंग गोष्टी वाचून व्हाल अवाक्

Sri Sri Ravi Shankar Birthday : श्री श्री रविशंकर हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक नेते, मानवतावादी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहे. ते आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तुम्हाला त्यांचं खरं नाव आणि रवि हे नाव कसं पडलं माहितीय का? 

May 13, 2024, 12:43 PM IST
1/10

भगवद्गीतेतील श्लोक त्यांना न शिकवता वयाच्या चौथ्या वर्षी ते श्लोक धडाधडा बोलत होते. त्यांचे पहिले शिक्षक सुधाकर चतुर्वेदी हे भारतीय वैदिक विद्वान आणि महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे. 

2/10

त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 10 दिवस 'मौन' ठेवून त्या काळात सुदर्शन क्रिया नावाचं एक साधे विश्रांती तंत्र निर्माण केलं. आता हे यंत्र जगभरातील 152 देशांमध्ये शिकवलं जातं. हार्वर्डमध्ये केलेल्या अभ्यासातून असं सिद्ध झालंय की, एड्सने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 70-80 टक्के रुग्णांना SKY (सुदर्शन क्रिया) चा लाभ होतो.   

3/10

बंगलोर विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर  शंकर महर्षी महेश योगी यांच्यासमवेत वैदिक विज्ञानावर चर्चा आणि परिषद घेण्यासाठी आयुर्वेद केंद्रे स्थापन केलं.   

4/10

शंकर यांनी युरोपमधील पहिला आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स 1983 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आणि 1986 मध्ये उत्तर अमेरिकेत पहिला कोर्स घेतला. 

5/10

तुम्हाला माहिती ते दाढी का ठेवतात? तर अधिक परिपक्व दिसण्यासाठी ते दाढी ठेवतात. त्यांनी एकदा सांगितलं होतं, 'जेव्हा स्टेजवर तरुणाला पाहून लोक निराश व्हायचे.'

6/10

रविशंकर स्वतःला एलएसडीचा राजदूत मानतात. जगातील सर्वात चुंबकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक असल्याने त्यांचे फॉलोअर्स लाखोच्या संख्येत असून ते सतत वाढत असतात. ते अनुयायांना सांगतात की, तुमचे स्मित स्वस्त ठेवा आणि तुमचा राग खूप महाग ठेवा. 

7/10

त्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आता 152 देशांमध्ये असून जगातील सर्वात मोठे स्वयंसेवक आधारित एनजीओपैकी ती एक मानली जाते.

8/10

त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा आहे. ते प्रवासातून परतल्यानंतर त्यांची आई, अम्मा त्यांना खूप रागवायची. कारण ते नेहमी रिकामी सुटकेस आणत होत. ते दिलेले सर्व कपडे इतरांना वाटून देत होते. 

9/10

 श्री श्री रविशंकर यांना 2009 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने भारतातील पाचवे सर्वात शक्तिशाली नेते ही पदवी बहाल केली. 

10/10

रविशंकर या नावामागेही एक रंजक गोष्ट आहे. त्यांच्या जन्माच्या दिवशी रविवार आणि त्यादिवशी शंकराचा जन्मदिवस होता. त्यामुळे त्यांचं नाव रविशंकर असं ठेवण्यात आलं.